Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शासकीय माहिती प्रसार माध्यमांना पुरवणाऱ्या MMRDA च्या आयुक्तांची चौकशी करा

शासकीय माहिती प्रसार माध्यमांना पुरवणाऱ्या MMRDA च्या आयुक्तांची चौकशी करा

प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Related Story

- Advertisement -

टॉप्स सिक्युरिटी संदर्भात ईडीने केलेल्या चौकशीची माहिती प्रसार माध्यमांना देणारे MMRDA चे आयुक्त आर. ए. राजीव यांच्यावर कारवाई करावी अशी मागण शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून MMRDA च्या आयुक्तांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. १६ फेब्रुवारीला MMRDA चे आयुक्त आर. ए. राजीव यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना चौकशी दरम्यानची माहिती दिली होती. केंद्रीय तपास यंत्रणेला तापासकामी सहकार्य करणे गरजेचं आहे. परंतु, चौकशी दरम्यान दिलेली शासकीय गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांना सांगण नियमांना धरुन नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले.

टॉप्स सिक्युरिटी प्रकरणी प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, या प्रकरणी MMRDA च्या आयुक्तांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना चौकशी दरम्यानची माहिती दिली असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. याबाबत सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गोपनियतेचा भंग करुन शासकीय माहिती प्रसार माध्यमांना उघडपणे पुरविल्याबद्दल MMRDA चे आयुक्त आर. ए. राजीव यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी पत्रात केली आहे. १६ फेब्रुवारी २०२१ ला MMRDA चे आयुक्त आर. ए. राजीव यांना MMRDA मध्ये २०१४-२०१७ आणि २०१७-२०२० या दरम्यान, टॉप्स सिक्युरिटी कंपनीला देण्यात आलेल्या कामाच्या चौकशी संदर्भात ईडीने त्यांची चौकशी केली होती.

- Advertisement -

Pratap Sarnaik Letter

टॉप्स सिक्युरिटी प्रकरणी सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली. ईडीला मी सर्वतोपरी सहकार्य करीन. त्याचबरोबर राजीव सारख्या जेष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा बचावात्मक पवित्रा न घेता खरीखुरी माहिती त्यांना देणं गरजेचं असताना आपल्या झालेल्या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांसमोर शासकीय गोपनीय माहिती जाहीर करणे गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी राज्याचे मुख्य सचिवांमार्फत करावी आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली.

- Advertisement -

 

- Advertisement -