Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 Auction: यंदा स्टिव्ह स्मिथ खेळणार निळ्या जर्सीत 

IPL 2021 Auction: यंदा स्टिव्ह स्मिथ खेळणार निळ्या जर्सीत 

स्मिथने मागील वर्षी राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले होते.

Related Story

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्यामुळे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या खेळाडू लिलावात स्मिथला कोणता संघ खरेदी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते. यंदा स्मिथ निळ्या जर्सीत खेळताना दिसणार असून त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने २.२० कोटी रुपयांत खरेदी केले आहे. स्मिथने मागील वर्षी राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले होते. परंतु, त्याला फलंदाज आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे राजस्थानने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याला दिल्लीच्या संघाने खरेदी केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या संघाचे प्रशिक्षकपद भूषवतो.

आयपीएल जिंकण्यासाठी उत्सुक 

दिल्ली कॅपिटल्सने मागील वर्षी पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना मुंबई इंडियन्सने पराभूत केल्याने दिल्लीची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. आता स्मिथच्या समावेशाने दिल्लीचा संघ अधिक मजबूत झाला असून ते यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. स्मिथने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९५ सामने खेळले असून त्यात ३५.३४ च्या सरासरीने २३३३ धावा केल्या आहेत. त्याला मागील वर्षी मात्र १४ सामन्यांत ३११ धावाच करता आल्या होत्या.


- Advertisement -

हेही वाचा – ग्लेन मॅक्सवेलची चांदी; ‘या’ संघाने केले १४.२५ कोटीत खरेदी


 

- Advertisement -