घरCORONA UPDATEस्वतःच्या लग्नाचा खर्च टाळून या IRS अधिकाऱ्याने सीएम फंडाला दिले १ लाख

स्वतःच्या लग्नाचा खर्च टाळून या IRS अधिकाऱ्याने सीएम फंडाला दिले १ लाख

Subscribe

राज्यात दरवर्षी लगीनसराईच्या मौसमाच्या निमित्ताने शेकडो लग्नसमारंभ महाराष्ट्रात होतात. या लग्नांसाठी लाखो करोडो रूपयांची उधळण होते. पण कोरोनाच्या संकट काळात ही उधळपट्टी न करता वाचवलेला पैसा हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देता येईल. त्यानिमित्ताने राज्याच्या कोरोनाविरोधातील लढ्याला आर्थिक पाठबळ मिळेल असा विचार मांडत इंडियन रेव्हेन्यू सेवेतील (आयआरएस) राहुल पाटील अधिकाऱ्याने आणि त्यांच्या भावी पत्नीने मिळून आपले लग्न कोरोनाच्या सावटामुळे पुढे ढकलले. या लग्नासाठी पैसा खर्च न करता एक लाख रूपये त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. त्यांची भावी पत्नी तेजस्विनी साळुंखे यांनी एमबीए शिक्षण पुर्ण केले आहे. तर सध्या इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात त्या काम करतात.

राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता या दाम्पत्याने आपले २ मे रोजीचे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारला मदतीची भावना ठेवत लग्नासाठी जमवलेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपुर्द केली. महाराष्ट्रात या काळात मोठ्या प्रमाणात लग्न होतात. प्रत्येक लग्नात होणाऱ्या पैशांच्या उलाढालीपैकी काही रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आली तरीही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकते. तसेच समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला आहे.

- Advertisement -
IRS rahul patil help
राहुल पाटील यांची मदत

इंडियन रेव्हेन्यू सेवेत चंद्रपूर आणि विदर्भ या भागासाठी त्यांच्याकडे बांबू रिसर्च एण्ड ट्रेनिंग सेंटरची जबाबदारी आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे जोवर राज्यातून संकटाचा कालावधी संपत नाही तोवर लग्नाची तारीख निश्चित करणार नाही असा निश्चयही त्यांनी केला आहे. आम्ही दोघांनी मिळून हे ठरवल होत की सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रूपये देण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यानुसार १ मे रोजी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही रक्कम सुपुर्द केली आहे. महाराष्ट्रातील लोकांनी या आर्थिक संकटात सहकार्य करायला हवे हा संदेश या प्रयत्नातून द्यायचा होता असेही त्यांनी सांगितले. आपण सुरूवात केली तर प्रत्येक लग्नाच्या माध्यमातून ही रक्कम जमा होऊ शकते याच उद्देशाने हा प्रयत्न केला असेही त्यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -