घरट्रेंडिंगकोरोनानंतर आता अमेरिकेत 'या' जीवघेण्या किड्याची दहशत; जाऊ शकतो अनेकांचा बळी

कोरोनानंतर आता अमेरिकेत ‘या’ जीवघेण्या किड्याची दहशत; जाऊ शकतो अनेकांचा बळी

Subscribe

हा किडा गांधीलमाशी सारखा दिसत असून त्याला 'मर्डर हार्नेट्स' असेही म्हटले जाते.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला. कोरोनाने संपुर्ण जगात थैमान घातले असताना आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू हा अमेरिकेतच झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे संकट असतानाच आता अमेरिकेत एका जीवघेण्या किड्याने नागरिकांमध्ये दहशत पसरवली आहे. कोरोनामुळे हतबल झालेल्या अमेरिकेत या लहान किड्याची भिती निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत आशियातील सर्वात मोठा हॉर्नेट किडा दिसून आला आहे. हा किडा गांधीलमाशी सारखा दिसत असून त्याला ‘मर्डर हार्नेट्स’ असेही म्हटले जाते.

- Advertisement -

सीएनएनच्या एका अहवालानुसार शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, विशेषत: वॉशिंग्टनमध्ये ‘मर्डर हार्नेट्स’ आढळले आहेत. हे कीटक मधमाश्यांना मारतात आणि माणसांसाठी देखील घातक तसेच जीवघेणे ठरू शकतात.

मधमाशा पालन करणाऱ्या लोकांनी असे सांगितले की, त्यांना अनेक अशा मधमाशा दिसल्या की त्यांची डोकी तुटलेली असतात त्या माशा खूप भयानक, जीवघेण्या असतात. मर्डर हॉर्नेट्स या २ इंचापेक्षाही अधिक लांब असतात. त्यांना जगातील सर्वात मोठे हॉर्नेट देखील संबोधले जाते. या किड्यांच्या फक्त दंश मारल्याने माणसांचे प्राण देखील जाऊ शकते, असे वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटीच्या काही तज्ज्ञांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच या माशांचा दंश अधिक विषारी असतो. मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करून हे काही क्षणातच सर्व मधमाशांना मारून टाकतात. या किड्यांच्या दंशाने माणसाचे नर्व्हस सिस्टम देखील बंद होऊ शकते. जपानमध्ये आढळणारा हा किडा दरवर्षी ३० ते ४० जणांचा सहज जीव घेतो.


Video: भयावह! माकडाने चिमुरडीला नेले फरपडत; पाहून तुम्हालाही बसेल धडकी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -