घरमहाराष्ट्रनाशिकजायखेडा : कोरोना रुग्णांत एकने वाढ

जायखेडा : कोरोना रुग्णांत एकने वाढ

Subscribe

एकूण रुग्णांची संख्या आता बारा

प्रकाश शेवाळे : जायखेडा

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्श पॅटर्न राबवत मागचे दोन महिने कोरोनाशून्य असलेल्या जायखेडा, जयपूर, सोमपूर या गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असताना मंगळवारी (दि. १६) पुन्हा नवीन एक कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. मात्र एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले ११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता वाडीपिसोळ या छोट्या गावात १ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे शहराप्रमानेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील जायखेडा गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने सतर्कतेसाठी कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे. जायखेडा गावात पोलिस बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे.सोमवारी क्वारंटाईन केलेल्या १२ व्यक्तीपैकी एकाचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्याने उर्वरित जायखेडा येथील ११ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, त्यांना  होमकॉरंटाईन राहाण्याचे आदेश प्रशासनाने बजाविले आहेत.

दरम्यान, सटाणा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील व जायखेडा येथील मयत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या कुटुंबातील व मित्रपरिवारातील तसेच अंत्यविधीसाठी उपस्थित असेल्या ४८ व्यक्तींना क्वारंटाईन करुन त्यांचे स्राव तपासणी साठी मंगळवार (ता. १६) रोजी पाठविण्यात आले आहेत. गुरूवारपर्यंत (दि. १८) या ४८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त होणार आहेत.

- Advertisement -

क्वारंटाईन केलेल्या ४८ व्यक्तींमध्ये डॉक्टर, महिला, पुरूष व लहान चिमुरड्यांचाही समावेश आहे. दिवसेंदिवस बागलाण तालुक्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने बाधितांची संख्या १५ वर पोहचली असुन, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. क्वारंटाईन ४८ व्यक्तींच्या अहवालाकडे प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष लागून आहे. प्रशासनाने काटेकोरपणे उपाययोजना केल्या आहेत. शिथिलतामध्ये नागरीकांनी गर्दीत जाने टाळावे अथवा अत्यावश्यक सेवेसाठीच दुकानात जावे. तालुक्यात  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांनी केले आहे. त्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जायखेडा गावात मयत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना प्रशासनाने तातडीने संस्थात्मक विलगीकरण करून अजमेर सौंदाने येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्या स्वॅब तपासण्या करण्यात आल्या. त्याचा स्वॅब तपासण्यांमध्ये नवीन दहा रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्कातील ही सर्व ४८ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण करून अजमीर सौंदाणे येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. शासकीय मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व व्यक्तींना योग्य त्या सर्व सेवा पुरविण्यात येत आहे. तरी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. तसेच वेळोवेळी शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना वितरीत केलेले आहेत त्यांचे पालन करावे.
– डाॅ. हेमंत अहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी, जायखेडा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -