घरताज्या घडामोडीRaj Thackeray: जैन मुनी पदम सागरजी महाराज शिवतीर्थावर, राज ठाकरेंची घेतली भेट

Raj Thackeray: जैन मुनी पदम सागरजी महाराज शिवतीर्थावर, राज ठाकरेंची घेतली भेट

Subscribe

जैन मुनी पदम सागरजी महाराज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत आहे. जैन मुनी पदम सागरजी हे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे संस्थापक आहेत. राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नव्या घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या घरी पाहुणे मंडळी येत आहेत. राज ठाकरे यांची दिवाळीपुर्वी गुरु माँ कांचन गिरी आणि जगतगुरु सुर्याचार्यजी यांनीही भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे आमंत्रण यावेळी गुरु माँ कांचन गिरी यांनी दिल होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नव्या घरात दिवाळीला पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश केला आहे. राज यांच्या नव्या घरी आतापर्यंत संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडूलकर आणि सुनेत्रा पवार यांनी देखील भेट दिली आहे. राज यांच्या नव्या घरातील वास्तव्य चांगले असावे अशा शुभेच्छा देण्यासाठी जैन मुनी पदम सागरजी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी जैन मुनींना आपलं घर दाखवले यावेळी ते गॅलरीमध्ये काही काळ गप्पा गोष्टी करताना दिसले.

- Advertisement -

मनसे नेते राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडत सोमवारी मुंबई गाठली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा होता परंतु काही कारणांमुळे राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला रवाना झाले. तर मंगळवारी राज ठाकरे यांच्या घरी सकाळी जैन मुनी पदम सागरजी भेटीसाठी आले आहेत. जैन मुनी यांच्या भेटीमुळे राज ठाकरे यांनी दौरा अर्धवट सोडला असल्याचे बोलले जात आहे.

अमित ठाकरे जैन मुनींच्या स्वागतासाठी हजर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे जैन मुनी पदम सागरजी यांच्या स्वागतासाठी घराच्या खाली आले होते. अमित ठाकरे यांनी जैन मुनी यांना आदराने प्रणाम करत त्यांच्याकडील वस्तु आपल्या हातात घेतल्या आणि त्यांना घरात घेऊन गेले.

- Advertisement -

हेही वाचा :  राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते – गुरू माँ कांचन गिरी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -