घरठाणेराष्ट्रवादीची जनजागर यात्रा रविवारपासून ठाण्यात

राष्ट्रवादीची जनजागर यात्रा रविवारपासून ठाण्यात

Subscribe

ठाणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आ. विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली जनजागर यात्रा रविवारी ८ जानेवारीला ठाण्यात येत आहे. ठाणे शहरात या यात्रेचा मुक्काम असून रविवार आणि सोमवार या दोन दिवसात या यात्रेद्वारे मोदी सरकारच्या चुकीचा धोरणांचा पर्दाफाश केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे- पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी दिली.

मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने ४ जानेवारीपासून जनजागर यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात या यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारीच्या अन्याय अत्याचाराविरोधात ही यात्रा काढण्यात येत आहे.  संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर आणि तालुक्यात जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून ही यात्रा ठाण्यात येत आहे.

- Advertisement -

गेल्या आठ वर्षात गॅस सिलिंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल, डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या खासगी क्षेत्रातील नोकर्‍यांवर आलेली कुर्‍हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये पळवण्याचे सुरू असलेले उद्योग तसेच राज्यातील लोकशाहीला घातक असणार्‍या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवर ही जनजागर यात्रा काढली असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.

ही यात्रा जनजागर यात्रा रविवार ८ जानेवारी व सोमवार ९ जानेवारी, २०२३ रोजी ठाणे शहरामध्ये येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली  रविवार ८ जानेवारी रोजी कळवा, मुंब्रा  येथे पोहचणार आहे. तसेच, सोमवारी ९ जानेवारीला ठाणे, ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात ही यात्रा फिरणार आहे. या यात्रेदरम्यान विविध ठिकाणी चौकसभादेखील होणार आहेत.

- Advertisement -

या जनजागर यात्रेमध्ये प्रदेश सरचिटणीस तथा मा. गटनेेते नजीब मुल्ला,  सय्यद अली अश्रफ, संजय वढावकर, प्रदेश चिटणीस  तथा मा. नगरसेवक  सुहास देसाई,  ठाणे व पालघर विभाग महिलाध्यक्षा ऋताताई जितेंद्र आव्हाड, माजी विरोधी पक्षनेते  हणमंत जगदाळे,  मिलिंद पाटील, प्रमिलाताई केणी,अशरफ पठाण (शानू) आदींसह राष्ट्रवादीचे सर्व मा. नगरसेवक,  कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -