घरमहाराष्ट्रJayant Patil : शिरसाटांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर जयंत पाटीलांनी दिले उत्तर, म्हणाले....

Jayant Patil : शिरसाटांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर जयंत पाटीलांनी दिले उत्तर, म्हणाले….

Subscribe

 

मुंबईः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. मात्र संजय शिरसाट यांच्या दाव्याला माझी प्रतिक्रिया मागणे हे म्हणजे जरा पुढेच जाते, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.

- Advertisement -

संजय शिरसाटांपेक्षा माझी विश्वासर्हता अधिकच असेल नाही का? त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यावर मी प्रतिक्रिया देणे म्हणजे जरा पुढेच जाण्यासारखे आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाः‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’

- Advertisement -

राष्ट्रवादीला आमचा पुळका का आला आहे कळत नाही. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म कॉंग्रेससोबत गद्दारी करुन झाला आहे त्यांनी आम्हाला गद्दार म्हणणं हे हास्यास्पद आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत केलेली गद्दारी आठवावी आणि राष्ट्रवादीने आमची चिंता करु नये, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तसेच जयंत पाटील हे स्वतः भाजपच्या वाटेवर आहेत. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील हे रडत होते. कारण शरद पवार यांनी राजीनामा दिला तर मी मेलोच याची त्यांना भीती आहे. म्हणूनच ते शरद पवार यांच्यासमोर रडत होते, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. त्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली. जयंत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया देत विषयच संपवला.

‘आम्ही पण खाजगी सर्व्हे केलेत’

आमच्या पक्षाने देखील खासगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचे सर्व्हे केलेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात मोठा पक्ष आणि लोकांचा पाठिंबा अधिक असणार पक्ष म्हणून पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोघांचा सत्कार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. जयंत पाटील म्हणाले की, अलिकडे जे सर्व्हे जे छापून येत आहेत. त्या सर्व्हेमध्ये काही तथ्य दिसत नाही. कारण आमच्या पक्षाने देखील खासगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचे सर्व्हे केलेले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय बळकट आहेत. अनेक मतदारसंघात असं चित्र आहे. त्यामुळे काही असत्यावर आधारीत सर्व्हेच्या बातम्या महाराष्ट्रात येत आहेत. याविषयी चर्चा निघाली त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही सर्व्हेची माहिती मी पक्षातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना अवगत करून दिली. त्याचा निकर्ष हाच आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात मोठा पक्ष आणि लोकांचा पाठिंबा अधिक असणार पक्ष म्हणून पुढे येत आहे. महाराष्ट्रातल्या काही भागात हे आमदार येणार, ते आमदार नाही येणार असे जे सांगण्यात आलेले आहे, नेमके तिथलेच सर्व्हेची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला. आमचे तिथले आमदार हे फार चांगल्या परिस्थितीत आहेत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -