घरमहाराष्ट्रकोणीही या..कोणालाही शिव्या द्या.. जितेंद्र आव्हाडांची 'ती' पोस्ट चर्चेत

कोणीही या..कोणालाही शिव्या द्या.. जितेंद्र आव्हाडांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा कडक शब्दात निषेध केला आहे. जाहीर आमंत्रण! कोणीही या.. महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या, असा आशयाचे ट्वीट आव्हाड यांच्याकडून पोस्ट करण्यात आले आहे.

साईबाबांबाबत बागेश्वर बाबाने केलेले वक्तव्य आणि नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांना मारून चांगलेच केले, हे कालिचरण महाराज याने केलेले विधान यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला सुरूवात झाली आहे. या प्रकरणांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याचा कडक शब्दात निषेध केला आहे. जाहीर आमंत्रण! कोणीही या.. महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या, असा आशयाचे ट्वीट आव्हाड यांच्याकडून पोस्ट करण्यात आले आहे.

“कालिचरण महात्मा गांधींना काय वटेल ते बोलतो … बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो. महाराष्ट्रातली प्रजा सोशिक आहे त्यांना राग येत नाही.. सरकार नपुंसक.. कोणी ही या काही ही बोला कुणालाही बोला सरकार काही करणार नाही.. जाहीर आमंत्रण” असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.

- Advertisement -

तर नंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीटरला पोस्ट करत लिहिले आहे की, “जाहीर आमंत्रण!
या… महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या.. छत्रपती शिवाजी महाराजांना द्या… जिजाऊ मातेला द्या.. महात्मा गांधींना द्या… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्या… महात्मा फुलेंना द्या… क्रांतीज्योती सावित्री माई ला द्या.. छत्रपती शाहू महाराजांना द्या… साई बाबांना द्या… यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या… कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धा स्थानांना घाला ….. असं वातावरण परत मिळणार नाही. #mahatmagandhi #saibaba” अशा शब्दांत आव्हाड यांनी या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
धीरेंद्र शास्त्री याने साईबाबा यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत म्हंटले आहे की, “मी कुणाची भावना दुखावत नाही. पण एवढेच सांगतो. साईबाबा संत होऊ शकतात, फकीर होऊ शकतात. पण देव होऊ शकत नाही,” त्यांच्या या वक्तव्यामुळे साईभक्त हे देखील संतापले असल्याचे समजते.

तर कालीचरण महाराज यांने महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत म्हंटले आहे की, “नथुराम गोडसेबाबत तुम्ही जेवढं वाचन कराल, तेवढं तुम्ही नथुराम गोडसेचे भक्त आणि गांधींचे विरोधक व्हाल. गांधींची हत्या करून गोडसेने योग्यच केलं. महात्मा नथुराम गोडसेला मी कोटी कोटी नमस्कार करतो. ते नसते तर आज भारताचा नाश झाला असता.” कालीचरण याच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून निषेध करण्यात येत असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा याने साईबाबा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिर्डी संस्थानाने देखील निषेध केला आहे. तसेच या प्रकरणी बागेश्वर बाबा याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिर्डी संस्थान आणि साई भक्तांकडून करण्यात आली आहे.


हेही वाचा – साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यांमुळे रोहित पवार संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -