घरताज्या घडामोडी'पेपर फोडणाऱ्यांसोबत लागेबंधे होते की यांना पेपर मिळाला होता', आव्हाडांची ABVPच्या आंदोलनावर...

‘पेपर फोडणाऱ्यांसोबत लागेबंधे होते की यांना पेपर मिळाला होता’, आव्हाडांची ABVPच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

Subscribe

म्हाडा पेपर रद्द झाल्यामुळे अखिर भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरासमोर आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. हे कार्यकर्ते कोणासोबत आहेत हे कळत नाही. पेपर फोडणाऱ्यांमध्ये यांचे कार्यकर्ते सहभागी होते? की यांच्या कार्यकर्त्यांना पेपर मिळाला होता असं वाटत असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यापेक्षा चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला कळत नाही आहे हे कोणासोबत आहेत. पेपर फोडणाऱ्यांसोबत यांचे लागेबंधे आहेत का? काही यांच्याच कार्यकर्त्यांना पेपर मिळाले होते. हे स्पष्ट झालं आहे की, पेपर फुटला नाही. पेपर फुटण्याची शंका पोलिसांनी म्हाडाशी स्पष्ट केल्यानंतर म्हाडाने कुठलाही विचार न करता परीक्षा रद्द केली. कारण गरीब, मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू नये.

- Advertisement -

नांदेडच्या कुठल्यातरी गावात १५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा अभ्यास करुन परीक्षेला बसणार आणि शहरातील श्रीमंत बापाचा मुलगा ५० ते ६० लाख रुपये देऊन परीक्षेत पास होणार हे मला मान्य नाही. यापुर्वीच मी सांगितले आहे की, जराशी शंका असली तरी या परीक्षा मी रद्द करणार तसे संकेत येत होते अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मी २४ तास चर्चा करत असतो

पेपरशी गोपनीयतेचा भंग केला यासाठी आम्ही परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द केल्यामुळेच जर आंदोलन होत असेल तर याचा अर्थ काय समाजावा. त्यांनी सांगितले असते चर्चा करायची आहे तर चर्चा करण्यास तयार झालो असतो. मी २४ तास चर्चा करत असतो. रात्री ३ वाजताही चर्चा केली आहे. शेवटी राजकारणात विरोधात असला तरी चर्चा ही महत्त्वाची आहे. यातून मार्ग सापडतो. आंदोलन करुन काय मिळणार फक्त टिव्ही वर चमकायचे. त्यापेक्षा समजून घ्या, परीक्षेची प्रोसेस काय असते, कुठल्या मार्गाने गेली? कुठे संशय आला? का परीक्षा रद्दचा निर्णय घेतला?. या निर्णयानंतर काही विद्यार्थ्यांनी मेसेज केला आहे. घेतलेला निर्णय योग्य असल्याचे विद्यार्थी म्हणाले आहेत. असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यांची निदर्शनं, पोलिसांनी काही जणांना घेतलं ताब्यात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -