घरताज्या घडामोडीज्योती देवरेंच्या समर्थनार्थ तहसीलदार संघटना मैदानात, सोमवारी राज्यव्यापी आंदोलन

ज्योती देवरेंच्या समर्थनार्थ तहसीलदार संघटना मैदानात, सोमवारी राज्यव्यापी आंदोलन

Subscribe

महिला अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार असून यापुर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्धच्या अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या अहवालात गंभीर आरोप करण्यात आले असून हा अहवाल दबावाखाली तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे या अहवालाची चौकशी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी संघटनेतर्फे राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याबाबत इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली महिला अधिकाऱ्यांची कुचंबणा झाल्यास महिला अधिकाऱ्यांचे करिअर संपून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्यामुळे आणि कुचंबणा होत असल्यामुळे आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. देवरे यांनी तशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होते. या ऑडिओ क्लीपमुळे मोठी खळबळ माजली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरेंविरोधातील तक्रारींची चौकशी करुन अहवाल तयार केला आहे. या अहवालात ज्योती देवरे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अहवालानुसार ज्योती देवरे यांच्याविरोधात कामात अनियमितता आढळली आहे. यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र हा अहवाल आता वादाच्या भोवऱ्यात आढळला असून या अहवालावर शंका उपस्थित होत आहेत. याच अहवालाच्या विरोधात आता राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून महिला अधिकाऱ्यांवर होणाऱ्या त्रासाचा निषेध केला आहे.

काय म्हटलंय तहसीलदार संघटनेच्या पत्रात

राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले असून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी १६ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. महिला अधिकारी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुचंबणा होत आहे. शासकीय कामकाजामध्ये अनेक अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप केला. ज्योती देवरे या कर्तव्यदक्ष महिला असून त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचे दिसतं आहे. त्या प्रस्थापितांची कामं मर्जीत राहून करत नसल्यामुळे वरिष्ठंकडून खोटे अहवाल सादर करत कारवाई सुरु केल्या, लोकांकडून तक्रारी लिहून घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेस प्रभाव निर्माण करण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीने खोट्या तक्रारींची भीती दाखवण्यात आल्याचे या प्रकरणात दिसत आहे.

- Advertisement -

महिला अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार असून यापुर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे शासन स्तरावर समिती गठीत करुन या प्रकरणाची वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून जर ही चौकशी पारदर्शकपणे झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे.


हेही वाचा : गांधींऐवजी जीनांना मारलं असतं तर ही वेळ आली नसती, मोदींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -