घरताज्या घडामोडीकर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 'इतक्या' जागा लढवणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ‘इतक्या’ जागा लढवणार

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मात्र आता राष्ट्रवादीने देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं (Karnataka Assembly Election) बिगूल वाजलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मात्र आता राष्ट्रवादीने देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये मिळून नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार देणार आहे. (Karnataka Assembly Election NCP is ready to contesting 9 seats including Belgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये मिळून ९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार देणार आहे. या सात जिल्ह्यांमध्ये कोडोगो (1 जागा), मैसूर (1), बेळगाव (1), बीजापूर (3 जागा), कोप्पल (1), हवेरी (1), विजयनरगर (1) अशा या जागा असणार आहेत.

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीसाठी मतदान एकाच दिवशी होणार आहे. 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.

राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढण्यात आला. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत तर्क वितर्क केले जात होते. पण पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली.

दरम्यान, भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) आपापल्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. प्रत्येक यादीसोबतच नेत्यांची नाराजीही वाढत चालली आहे, भाजपने अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, त्यानंतर पक्षपरिवर्तनाची प्रक्रिया सुरूच आहे.

भाजपच्या या उमेदवारी यादीत घराणेशाही झळकताना दिसून येतेय. घराणेशाहीवरून भाजप सातत्याने काँग्रेसची खरडपट्टी काढत असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रत्येक निवडणुकीच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या घराणेशाहीवरून खिल्ली उडवत असतात. मात्र, कर्नाटकात भाजपकडून घराणेशाहीलाच प्रधान्य दिलेलं दिसत आहे.


हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्धार, क्युरेटिव्ह पिटिशन शासन दाखल करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -