घरमहाराष्ट्रपंढरपुरातील कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

पंढरपुरातील कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

Subscribe

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं. या वर्षी देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे. याचं निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे अनेक भाविकांनी प्रस्थान केले आहे. यंदा कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, आज रात्री बारा वाजता विठ्ठलाच्या नित्यपूजेला सुरुवात केली जाणार असून त्यानंतर पाद्यपूजन देखील करण्यात येईल.

या पूजेदरम्यान रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहिल. तसेच पहाटे 2 च्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंबासहीत विठ्ठल मंदिरात पोहोचतील. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संदीपान भुमरे, खासदार रणजित निंबाळकर, आमदार समाधान अवताडे उपस्थित असतील.

- Advertisement -

विठ्ठल पूजेनंतर रुक्मिणीमातेची देखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचे मंदिर समितीच्या वतीने सत्कार होईल. त्यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले केले जाईल.

दरम्यान, यंदा कार्तिकी एकादशीला पंढरपूरात कमी संख्येत वारकरी दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला. त्यामुळे कमी संख्येत वारकरी यात्रेला हजर झाले आहेत. शिवाय यामुळे पंढरपूरातील अनेक व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी 15 दिवस आधीपासून येथील सर्व प्लॉट बुक झालेले असतात. मात्र, आता या संख्येत घट झालेली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

देवउठनी एकादशीला 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार भगवान विष्णू; जाणून घ्या तुळसी विवाहाचे महत्त्व

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -