घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं कारस्थान सुरु आहे - किरीट सोमय्या

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं कारस्थान सुरु आहे – किरीट सोमय्या

Subscribe

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं कारस्थान सुरु आहे, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आले आहेत. बेनामी खात्यांद्वारे ५३ कोटी ७२ लाख रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा सोमय्यांनी केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्या हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सकाळी शेगावात दाखल झाले असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला लुटण्याचा कारस्थान सुरु असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलतांना केला.

मागील काही दिवसापूर्वी बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या चाचपणी केली होती. तर काही खात्यांबाबत कागदपत्रे पूर्ण करून घेण्याच्या सूचना संस्थेला दिल्या होत्या. दुसरीकडे भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाले आहे, असा दावाही सोमय्यांनी केला होता. याच संदर्भात सोमय्या आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेच दुखणं सुरू झालं असा टोला लगावतच उद्धव ठाकरे लवकर बरे होवोत अशा सदिच्छा देखील सोमय्या यांनी यावेळी दिल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -