घरताज्या घडामोडीनवीन वर्ष जेलमध्ये साजरे कराल, हाजी अराफत शेख यांचा मलिकांना इशारा

नवीन वर्ष जेलमध्ये साजरे कराल, हाजी अराफत शेख यांचा मलिकांना इशारा

Subscribe

मलिकांच्या घोटाळ्याचे सगळे पुरावे मी ईडीकडे सुपूर्त करणार

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या विरोधात केलेल्या गौप्यस्फोटावर हाजी अराफत शेख यांनी प्रत्युत्यर दिले आहे. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर हाजी अराफत शेख यांनी पत्रकार परिषदे घेत मलिकांवर चांगलात हल्लाबोल केला आहे. यावेळी हाजी अराफत यांनी मलिकांनी अनेक भ्रष्टाचार केल्याचा खुलासा केलाय तसेच त्यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. यावेळी हाजी अराफत यांनी नवाब मलिक नवीन वर्ष जेलमध्ये साजरे कराल असा इशारा दिलाय. मलिकांच्या घोटाळ्याचे सगळे पुरावे मी ईडीकडे सुपूर्त करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कसाईवाड्यापासून फर्जिवाड्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. कुर्ल्यातील चरस मलिक कोण आहे देखील बाहेर येईल, असा इशारा देखील हाजी अराफत यांनी दिला.

यावेळी हाजी हफरत यांनी नवाब मलिकांनी मंत्रालयातही मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खुलासा केला. मलिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी रिटायर्ड ऑफिसर अनीज शेख यांना अनधिकृत पदावर बसवले. ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आले मात्र कॅबिनेटच्या परवानगी शिवाय अनीज शेख यांची नियुक्ती केली. त्यानंतर पठाण या डेस्क डेप्युटी कर्मचाऱ्याला ऑफिसर बनवले. पठाण यांच्याकडे मुंबईतील मुस्लिमांच्या जमिनीची सर्व माहिती होती. त्याच्यामार्फत राज्यातील मुस्लिमांची जमिन ताब्यात घेता आली. २८ पीऊनला मलिकांनी ऑफिसर बनवले. याची माहिती मी काढली तेव्हा त् त्यात २८ ऑफिसर मंत्रालयात पीऊनचे काम करत असून पीयूनचा पगार घेत असल्याचे समोर आल्याचे हाजी हसरत यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील एक भ्रष्ट मंत्री राज्यातील अल्पसंख्याक लोकांच्या समस्या सोडून स्वत:च्या जावयाचा राग काढण्यात व्यस्त आहेत.  कुत्रा मांजर पाळा पण मलिक गैरसमज पाळू नका. नवाब मलिकांचे लक्ष हे राज्यातील अल्पसंख्याक लोकांचे प्रश्न सोडवणे हे नसून राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम लोकांच्या अधिकृत जमिनी अनधिकृत करुन त्या स्वत:च्या नावाव करुन घेणे हे आहे. त्यांचा हा धंदाच असल्याचे हाजी हफरत यांनी म्हटले.

पुढे हाजी हफरत यांनी म्हटले, मलिकांनी पहिला घोटाळा मुंब्राच्या झुंमा मस्जिदमध्ये केला.या मस्जिद ची जागा कोणीही ट्रस्टी शिवाय कोणाला भाड्याने देऊ शकत नाही, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.मात्र तरीही  या ठिकाणी नवाब मलिकांनी ९ करोड रुपयांचा घोटाळा करत मस्जिदची जागा ३० वर्षांसाठी भाड्याने दिली. यात ९ बोर्डांपैकी एकही अधिकारी नव्हता. यात केवळ खालीत बाबू कुरेशी नावाचा एक सदस्य होता. त्याला जेव्हा ही जागा अनधिकृतपणे भाड्याने देण्याचा अधिकार नवाब मलिक यांना नाही हे कळल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी नवाब मलिक आणि मंत्रालयाला एक मेल केला ज्यात मला चुकीच्या पद्धतीने तुम्ही या व्यवहार सही घेतली असून मी तुम्हाला या व्यवहारात तुमची साथ देणार नाही असे म्हटले. मात्र तरीही त्यांनी जागा भाड्याने दिली. मुस्लिमांचे अधिकारी डावळून नवाब मलिकांनी मस्जिदची जागा ३० वर्षांसाठी भाड्याने दिली. मंत्रालयात नवाब मलिकांनी आपल्या स्वार्थ्यासाठी आणून ठेवलेल्या या दोन मंत्र्यांची चौकशी व्हावी अशी मागणी हाजी हफरत यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Money Laundering Case : ऋषिकेश देशमुखला दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर २० नोव्हेंबरला सुनावणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -