भ्रष्टाचार आणि माफियागिरी केली तर, त्याचा हिशोब घेणारच! किरीट सोमय्यांनी डिवचलं

एकीकडे सदानंद कमद यांचे दापोली साई रिसॉर्ट प्रकरण आणि दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाने महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे. यावर किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला चांगलंच डिवचलं आहे.

Kirit Somaiya

महाराष्ट्रात ईडी पुन्हा एकदा ऍक्टिव मोडमध्ये आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरलेल्या दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अटक केलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. आज सकाळी कागलमधील त्यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडींवर आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुढे येत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

एकीकडे सदानंद कमद यांचे दापोली साई रिसॉर्ट प्रकरण आणि दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाने महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे. यावर किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला चांगलंच डिवचलं आहे. तसंच ईडीच्या कारवाईकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्त्यूत्तर देखील दिलंय. “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे काही उरलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्यांचं नाव आणि चिन्ह मिटवून टाकलं तर म्हणतात निवडणूक आयोगानं २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाय. ईडीने संजय राऊतांना अटक केली तर म्हणतात सूडबुद्धीने कारवाई केली. रश्मी ठाकरे यांच्या नावे रेवदंडा परिसरातील कोर्लई गावात असलेल्या १९ बंगल्यांचा रेकॉर्ड का मिटवला? यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे कधी का बोलत नाही? असा सवाल देखील किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.

यापुढे बोलताना किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला इशारा देखील दिलाय. “जर तुम्ही माफियागिरी करणार, भ्रष्टाचार कऱणार, तर त्याचा हिशोब आम्ही घेणारचं”, असं देखील किरीट सोमय्यांनी म्हटलंय.