घरमहाराष्ट्र"दादा हिमालयात जावा''; चंद्रकांत पाटलांसमोर मविआच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

“दादा हिमालयात जावा”; चंद्रकांत पाटलांसमोर मविआच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

Subscribe

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांसह भेट देण्यास सुरुवात केली. यावेळी चंद्रकांत पाटील हे मंगळवार पेठेतील बूथवर पोहोचले असता त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांसह भेट देण्यास सुरुवात केली. यावेळी चंद्रकांत पाटील हे मंगळवार पेठेतील बूथवर पोहोचले असता त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. ‘दादा हिमालयात जावा’ अशीही घोषणा यावेळी देण्यात येत होती. कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तेथून काढता पाय घेतला.

चंद्रकांत पाटील मंगळवार पेठेतील बूथवर पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोष करण्यात आला. तसंच, ‘दादा हिमालयात जावा’ अशीही घोषणा यावेळी दिली जात होती. यावेळी पोलीसदेखील उपस्थित होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने चंद्रकांत पाटील गाडीतून तेथून निघून गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याबाहेरील 20-25 कार्यकर्त्यांसह टोप्या व गळ्यात पक्षाचे स्कार्फ घालून मतदान केंद्रावर आले होते. हे एकप्रकारचं दबावतंत्र व शक्तीप्रदर्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवार पेठेतील अहिल्यादेवी मतदान केंद्रावर पाटील आले तेव्हा संतप्त मतदार आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय जिजाऊ,जय शिवराय अशा घोषणा देत त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. मतदान केंद्रावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

“जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक आव्हान देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला होता. त्यामुळं आज संतप्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला चंद्रकांत पाटील यांना समोरं जावं लागलं.

- Advertisement -

हेही वाचा – माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटकवण्याचा सरकारचा प्रयत्न होता : प्रवीण दरेकर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -