घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकोयता, चॉपरचा धाक दाखवून किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा दरोडा

कोयता, चॉपरचा धाक दाखवून किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा दरोडा

Subscribe

नाशिक : सातपूर येथील किराणा व्यावसायिक घरात मंगळवारी (दि. १९) दुपारी बेल वाजवून प्रवेश करत चार दरोडेखोरांनी कोयता आणि चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. यात तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन ते तीन लाखांचा ऐवज चोरून नेला.

सातपूर कॉलनी पपया नर्सरी मागे साईरत्न अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ६ मध्ये किराणा व्यावसायिक संजय त्रिवेदी कुटुंबियांसह राहतात. ते बुधवारी दुकानात गेले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी आई, पत्नी व मुलगी होती. त्यावेळी दरवाजाची बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता चार दरोडेखोर हातात कोयता व चॉपरचा धाक दाखवून घरात प्रवेश केला.

- Advertisement -

दरोडेखोरांनी मुलीच्या गळ्यावर चॉपर ठेवत आईला धमकावून दोन टोळ्यांचे मंगळसूत्र व एक टोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत पळ काढला. दरम्यान, एक दरोडेखोर इमारती खाली पल्सरवर होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांनी पाहणी केली. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पुढील तपास सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

भगवानगड दरोड्याचा वर्षभरानंतरही तपास शून्य

सातपूर कॉलनी ८ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता नागरगोजे यांच्या भगवानगड या बंगल्यावर व त्यानंतर सात आठ ठिकाणी असाच सशस्त्र दरोडा पडला आहे. या बाबतीत तपास शून्य असताना सातपूर कॉलनीत भरदुपारी पाच दरोडेखोर येत दरोडा टाकून पळून गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -