घरठाणेभिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा

Subscribe

अधिवेशनात आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष

भिवंडी । भिवंडी मनपाच्या शाळांची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या शाळांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासह महापालिकेने लक्ष द्यावे यासंदर्भात भिवंडी पूर्वचे सपा आमदार रईस शेख यांनी बुधवारी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. शहरात मनपाच्या ४९ शाळा असून शाळांमध्ये एकूण २८,००० विदयार्थी शिक्षण घेत आहेत.मात्र या शाळांची स्थिती अत्यंत दयनीय व धोकादायक स्थितीत आहे. सन २०२१-२०२२ माध्यम निहाय संच मान्यतेनूसार ११२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच शालेय विदयार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके पुरविले जात नाहीत, शौचालय, पाणी, वीज यांसारख्या मुलभूत सुविधांची वानवा मोठ्या प्रमाणावर आहे.

या शाळांच्या डागडुजी व दुरूस्तीकरीता ३० कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. तसेच संच मान्यतेनूसार शिक्षकांच्या जागा रिक्त असूनसुद्धा शासन परवानगीविना जिल्हा बदलीचे आदेश देण्यास मनाई असताना नियमबाहय पद्धतीने शिक्षकांची जिल्हा बदली करण्यात येते. त्यामुळे महागनरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची संख्या वाढल्याने शिक्षणाचा दर्जा खालावून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विदयार्थी वंचित राहत आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाच्या अर्थसंकल्पानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने शिक्षणासाठी अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी सभागृहात केली.

- Advertisement -

आमदार शेख यांच्या लक्षवेधी सुचेनेला शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देत शेख यांच्या मागण्या मान्य केल्या असून शाळांच्या डागडुजी व दुरूस्तीकरीता ३० कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवायला सांगितले असून रिक्त शिक्षकांची भरती लवकरच सुरू करण्यात येणार असून मुंबईत अतिरिक्त शिक्षक असून त्यामधील उर्दू आणि मराठीचे शिक्षकांना भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये रुजू होण्याकरिता शिक्षकांना सूचना दिल्या जातील व एक महिन्यात याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तर केतांना म्हटले असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -