घरCORONA UPDATEहे सरकार आम्ही पाडणार नाही, ते अंतर्विरोधाने पडेल - देवेंद्र फडणवीस

हे सरकार आम्ही पाडणार नाही, ते अंतर्विरोधाने पडेल – देवेंद्र फडणवीस

Subscribe

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्याचा आढावा घेतला असून यावेळी त्यांनी कोरोनाच्या मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या. देवेंद्र फडणवीस यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, कोरोना संकट रोखण्यासाठी नियोजनांवर भर देण्याची सध्या गरज आहे. आताच्या घडीला चाचण्या करण्यामध्ये महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर आहे. कोरोना रुग्णांवर चांगले उपचार होण्यासाठी महापालिकांना पैसे पुरवणे गरजेचे आहे. सरकारने महानगरपालिकांना आर्थिक मदत दिली पाहिजे. नवी मुंबईत नॉन कोविड रुग्णांसाठी व्यवस्था नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच आयसीयू व्हेंटिलेटरचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. शिवाय पनवेलमध्येही व्हेंटीलेटरची कमतरता आहे. हे सर्व आरोग्य विषयक प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, सरकारी यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टिकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की,

हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधाने पडेल. १२ आमदारांपेक्षा महाराष्ट्राची १२ कोटी जनता आमच्यासाठी महत्वाची आहेत. कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार नव्या कपोलकल्पित कथा रचणे योग्य नाही. सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही. राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत. मराठा आरक्षण हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. आम्ही जेव्हा आरक्षण दिले, तेव्हा सर्व पक्षांना विश्वासात घेतले होते. मोठी टीम तयार करून आम्ही काम करत होतो. राज्य सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांकडे आस्थापना मंडळ असते. ते मंडळ बदल्या ठरवीत असतात. समन्वयाचा अभाव तर आहेच. पण विश्वासाचा सुद्धा मोठा अभाव दिसतो आहे. देशातील संसर्गापेक्षा महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण फारच अधिक आहे. कमी चाचण्या हेच महाराष्ट्रातील कोरोना वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे. सातत्याने सांगतो आहे, अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आलेली नाही. मुंबईतील ४०० मृत्यू आणखी पुढे आलेले नाही, असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा –

LACवर ३० हजार भारतीय जवान तैनात, चीनसोबत तणाव वाढला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -