घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसूरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी नोव्हेंबरमध्ये भूसंपादन प्रक्रिया

सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी नोव्हेंबरमध्ये भूसंपादन प्रक्रिया

Subscribe

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनूसार चेन्नई सुरत हा ग्रील फिल्ड सहापदरी महामार्ग उभारला जाणार असून नाशिकमधून जाणार्‍या या महामार्गासाठी नोव्हेंबर अखेर भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला.

१२७० किलोमीटरच्या या मार्गातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी आणि निफाड या तीन तालुक्यांतून १२२ किलोमीटरचा हा महामार्ग जाणार असून याकरीता भूसंपादन निवाडे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महामार्गामुळे नाशिक ते सूरत हे अंतर १७६ किलोमीटरवर येईल. त्यामुळे नाशिक सुरत पाच तासांचा प्रवास अवघ्या सव्वा तासात गाठता येईल. त्यामुळे दोन्ही शहरांच्या उद्योग, व्यापार, शेती क्षेत्राला फायदा होणार आहे.

- Advertisement -

या प्रकल्पातील निवाडे प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ऑक्टोबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबरपासून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल. साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी अखेरपर्यंत मोबदला वाटप करून जून २०२३ पर्यंत जमीनीचे महामार्गासाठी हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले.

असा होणार फायदा

 ग्रीनफील्ड महामार्गामुळे नाशिकमधून दाक्षिणात्य राज्यांतही भाजीपाला पाठवता येईल. तसेच निर्यातीसाठी थेट बंदरात माल पोहचवता येईल. त्याचप्रमाणे शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी गड, वणी या तीर्थस्थळांकडे सूरतमधून दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात त्यांनाही हा महामार्ग लाभदायी ठरेल.

कसे असेल स्वरूप
  • १२२ किलोमीटर नाशिक जिल्ह्यातून जाणार
  • ९९५ हेक्टर जमिनीचे होणार संपादन
  • १५ हजार कोटी जिल्ह्यात महामार्गावर खर्च
  • ३ पॅकेजमध्ये होणार काम
  • २ पॅकेजच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू
  • २०२६ मध्ये पूर्ण होणार काम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -