घरमहाराष्ट्रहवामानात बदल! घराबाहेर पडण्याआधी हा मुंबईचा हवामान रिपोर्ट वाचा...

हवामानात बदल! घराबाहेर पडण्याआधी हा मुंबईचा हवामान रिपोर्ट वाचा…

Subscribe

ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. त्यामुळे काही भागात हिवाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळत आहे.

Latest Wather Update Mumbai : कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी असा जानेवारीचा महिना संपल्याबरोबर थंडीही संपली असं वाटत असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. पुन्हा एकदा स्वेटर वापरण्याची वेळ येणार की काय, असा विचार करत असतानाच सकाळपासून मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय. पुढचे दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा थंडी परतणार आहे, असाही हवामानाचा अंदाज आहे.

कोकण आणि विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ७ अशा १७ जिल्ह्यांत पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

बदललेल्या वातावरणामुळे काही भागात थंडीचा प्रभाव जाणवणार आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात जाणवत असलेला थंडीचा प्रभावही कायम राहणार आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस ढगाळ वातावरण असणार आहे. ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. त्यामुळे काही भागात हिवाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळत आहे.

- Advertisement -

वातावरण बदलाचा पिकांना फटका

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर आता लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे. नाशिकमध्ये धुक्याची चारद पसरल्याने तेथील द्राक्ष उत्पादने धोक्यात आली आहे. तर, बहुतांश भागात कांदा पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मात्र, २९ जानेवारीनंतर पुन्हा तापमानात घट होऊन थंडीचा जोर राज्यभरात वाढण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असंही सांगण्यात आलं आहे.


हेही वाचाः विमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून अटकेची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -