घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसावकारी पाश अधिक घट्ट; जाचाला कंटाळून भावांचे विषप्राशन, एकाचा मृत्यू

सावकारी पाश अधिक घट्ट; जाचाला कंटाळून भावांचे विषप्राशन, एकाचा मृत्यू

Subscribe

नाशिक : खासगी सावकारीने वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यातून सातपूरमध्ये पित्यासह दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकरोडला रविवारी (दि.५) सायंकाळी दोन सख्ख्या भावांनी विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात एका भावाचा मृत्यू झाला असून, दुसर्‍या भाववर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रवींद्र लक्ष्मण कांबळे (३७, रा. भालेराव मळा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जगन्नाथ कांबळे असे उपचार सुरु असलेल्याचे नाव आहे.

कांबळे यांनी खासगी सावकाराकडून घेतले होते. ४० लाखांच्या कर्जवसुलीसाठी सावकाराकडून तगादा सुरु होता. त्यातून दोघे सख्खे भाऊ ताणतणावत होते. दोघांना खासगी सावकाराने मारहाण केल्याचेसुद्धा समोर आले. त्यातून दोघांनी रविवारी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्मपूर्वी जगन्नाथ कांबळे याने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात रवींद्र कांबळे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईत नोट पोलिसांच्या हाती
  • मृताच्या नातेवाईकांचा नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूककोंडी
  • जोपर्यंत संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी घेतली नातेवाईकांनी भूमिका
  • नातेवाईक आक्रमक झाल्याने नाशिक शहर पोलिसांनी ठेवला होता चोख बंदोबस्त

शहरातील आजवरच्या घटना

  • जानेवारी २०२२ : अशोकनगरच्या निलेश सोनवणे (वय ३०) यांनी खासगी सावकाराकडून १० हजारांचे कर्ज घेतले. चक्रवाढ व्याजासह वसुलीच्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
  • डिसेंबर २०२२ : पाथर्डी फाटा परिसरात गौरव व नेहा जगताप या दाम्पत्याने खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली.
  • डिसेंबर २०२२ : पंचवटीत एका खासगी सावकराने वसुलीचा तगादा लावत महिलेचा घरात घुसून विनयभंग केला.
  • डिसेंबर २०२२ :  हॉटेल व्यावसायिक सुरेश पुजारी (वय ५४, रा. राणेनगर) यांनी खासगी सावकार संशयित विजय देशमुख (रा. कर्मयोगीनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध पाच टक्क्यांसह कर्ज परत केले तरी धमकी देत असल्याने मुंबईनाका पोलिसात फिर्याद दिली आहे.
  • २९ जानेवारी २०२३ : सावकारांनी ३०.१८ लाख कर्जाच्या वसुली तगादा लावल्याने सातपूरमध्ये पित्यासह दोन मुलांची आतमहत्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -