घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपती व त्याच्या प्रियसीकडून छळ; विवाहितेची आत्महत्या

पती व त्याच्या प्रियसीकडून छळ; विवाहितेची आत्महत्या

Subscribe

नाशिक : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती व त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील बाबूराव भिका गरुड (रा. मालेगाव जि.नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वैशाली आनंदा पगारे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने २५ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आनंद दगा पगारे व माया अशोक खोडवे (रा. दोघे अचानक चौक, सिडको) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यात पैसे व कन्यादान का दिले नाही, जावयास सोन्याचे दागिने का दिले नाही, या कारणावरून वेळोवेळी पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आनंद पगारे व त्याची प्रेयसी माया खोडवे यांच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादी बाबूराव गरुड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. मयत वैशाली हिला दोन्ही मुलीच झाल्याने या छळात भर पडली. संशयितांच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -