घरदेश-विदेशLive Update : KKR VS PBKS : पंजाब किंग्जचा कोलकातावर 8 विकेट्सने...

Live Update : KKR VS PBKS : पंजाब किंग्जचा कोलकातावर 8 विकेट्सने विजय

Subscribe

KKR VS PBKS : पंजाब किंग्जचा कोलकातावर 8 विकेट्सने विजय

26/4/2024 19:2:48

- Advertisement -

KKR VS PBKS : पंजाबचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

26/4/2024 19:2:20

- Advertisement -

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. इडजेस अंगमो कुंदन, (IAS:MH:1996) प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. रणजित सिंग देओल (IAS:MH:1998) प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. अंशू सिन्हा, (IAS:MH:1999) यांची प्रधान सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

26/4/2024 18:54:50


काँग्रेस नेते नसीम खान यांचा स्टार प्रचारक आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रचारक पदाचा राजीनामा

उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारल्याने नसीम खान नाराज होते

26/4/2024 18:51:26


खासदार हेमंत गोडसेंनी खरेदी केला उमेदवारी अर्ज

खासदार गोडसे शिवसेना शिंदे गटाचे खासदार

नाशिक लोकसभेत महायुतीचा तिढा कायम असतानाही गोडसेंकडून उमेदवारी अर्जाची खरेदी

26/4/2024 14:6:12


मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जात असताना पोलिसांनी रोखले

पोलिसांनी रोखल्याने कोटेचा यांचे कार्यकर्ते आक्रमक

मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

26/4/2024 13:57:17


काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचल्या

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

26/4/2024 13:16:24


राज ठाकरे यांच्या घरी मनसे समन्वयकांची बैठक

बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, संदीप देशपांडे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित

26/4/2024 12:51:6


शिवसेना शिंदे गटाचे सोलापुरातील नेते नारायण पाटलांचा पक्षाला रामराम

नारायण पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला ऐन निवडणुकीत मोठा धक्का

26/4/2024 12:44:59


भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांच्यासाठी घेतला अर्ज

नाशिक लोकसभेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

नाशिक लोकसभेवरून महायुतीत अद्यापही तिढा कायम

26/4/2024 11:47:8


ईशान्य मुंबईतून आज मिहीर कोटेचा उमेदवारी अर्ज भरणार

मिहीर कोटे यांची अर्ज भरण्यासाठी मोठी रॅली

मिहीर कोटे यांच्या रॅलीत माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार मनोज कोटक, आमदार प्रविण दरेकर सहभागी

26/4/2024 11:22:31


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

26/4/2024 10:44:53


मविआचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

परवानगी न घेता चंद्रहार पाटलांनी मिरजेत काढली प्रचार रॅली

26/4/2024 8:37:53


मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम

पुढील 48 तासात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

26/4/2024 7:32:29


सर्वोच्च न्यायालयाने वकिलांसाठी व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू

व्हॉट्सॲपवर फाइल करणे, सूची करणे आणि कारण सूची त्वरित उपलब्ध होईल.

वकिलांना काम करणे होणार सोपे

26/4/2024 7:32:29

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -