घरताज्या घडामोडीLive Updates : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम

Live Updates : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम

Subscribe

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम

मंत्री गिरीश महाजन यांची वेळ वाढवून देण्याची मागणी साठी मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळली

मी सरकारला यापूर्वी तीन महिन्यांचा वेळ दिला, आता पुन्हा वेळ कशाला? असा सवाल जरांगे यांनी केला आहे.


‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा अजित पवार गटात प्रवेश

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत उदयकुमार आहेर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला

मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे हे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारचा निरोप घेऊन आले आहे.

- Advertisement -

सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात दाखल

मनोज जरांदे पाटील यांची मनधरनी करण्याचा पुन्हा एकदा होणार प्रयत्न

गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, राजेश टोपे, पालकमंत्री संदीपान भुमरे, अतुल सावे, बदलापूरचे आमदार नारायण कुचे सरकारच्या शिष्टमंडळाकडून उपस्थित


भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश, इतर सामाजिक कार्यकर्त्यांचाही झाला पक्षप्रवेश


आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 जणांचा संघाची घोषणा


जी २० डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप; निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ लिहिल्याचा आरोप


जळगाव विमानतळावर शरद पवार दाखल; कार्यकर्त्यांकडून स्वागत


शासनाचे शिष्टमंडळ आज दुपारी 12.30 वाजता जालन्यात जरांगेंची घेणार भेट


जालन्यातील लाठी हल्ल्याविरोधात अहमदनगरच्या कोपर्डीमधील ग्रामस्थ आजपासून उपोषण सरू


शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा होणार


जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -