घरमहाराष्ट्रकोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही - अजित पवार

कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही – अजित पवार

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. तसंच कोल्हापूरकरांनी सहाकार्य करावं असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं.

निर्बंधाच्या बाबत कोल्हापूर चौथ्या टप्प्यात मोडतो. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण कोल्हापुरात आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत. उलट काही बाबतीत कोणी नियम पाळत नसतील तर नियम अधिक कडक केले जातील असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोल्हापूर जिल्हा यातून बाहेर पडावं यासाठी काही काळ निर्बंध सोसावे लागतील. कोल्हापूरकरांनी यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन अजित पवार यानी केलं.

- Advertisement -

अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी भेटीत काय काय ठरलं याची माहिती दिली. गृहविलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केलं. कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या असणाऱ्या गावातील सर्वांच्या चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोना चाचणीचं प्रमाण दीडपट, दुपटीनं वाढवण्यास सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी टास्क फोर्सची तयारी करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. खासगी रुग्णालयांनी नियमाप्रमाणे बिलं लावावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य, वैद्यकीय, महसूल, ग्रामविकास विभागाच्या कामांमध्ये एकी दिसली तर उत्तम काम होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसंच १५ जूननंतर लस उपलब्धता वाढल्यास कोल्हापुरातील लसीकरण केंद्र वाढवू, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

आरोग्य विभाग,ग्रामविकास विभागाकडे स्टाफ कमी आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये भरती बाबत आढावा घेऊ, असं अजित पवार म्हणाले. दिव्यांग व्यक्तींना लसीकरण द्यायला सांगितलं आहे. दुर्गम भागातील रुग्णवाहिकांचा प्रश्न इकडे आहे त्यांना माय लॅब रुग्णवाहिका उपलब्ध होईल. ५ जुलैला पावसाळी आधिवेशन सुरू होईल. त्यात काही पुरवणी मागण्या मंजूर केल्या जातील, असं अजित पवारांनी नमूद केलं.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -