घरमहाराष्ट्रसोलापुरः संचारबंदीत यात्रेतील रथ ओढू न दिल्याने गावकऱ्यांचा पोलिसांवर हल्ला

सोलापुरः संचारबंदीत यात्रेतील रथ ओढू न दिल्याने गावकऱ्यांचा पोलिसांवर हल्ला

Subscribe

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक विधी रद्द झाले असले तरी काही जमलेल्या तरुणांनी यात्रेतील रथ ओढण्याचा केला प्रयत्न

देशाभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना या जीवघेण्या कोरोनाने अनेक बळी देखील घेतले आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात नागरिकांना होऊ नये म्हणून देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन देखील करण्यात आला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी लागू असताना अनेक धार्मिक स्थळ देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह धार्मिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन देखील वारंवार करण्यात येत आहे. असे आवाहन असताना देखील सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात वागदरी येथे जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून करण्यात आलाचा प्रकार समोर आला आहे.


हेही वाचा – CoronaEffect – एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसूनही आख्खं गाव झालं कोरोनाग्रस्त!

सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात परमेश्वर देवस्थानची यात्रा भरवण्यात आली. सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केलेले असताना सुद्धा तरुणांनी रथ ओढण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी या तरुणांना हटकून या तरूणांना रोखन्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवर गावकऱ्यांनी दगडफेक केली. ही घटना रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

संचारबंदी असताना वागदरीत हा निंदनीय प्रकार 

दरवर्षी वागदरी या गावात यात्रेत रथ ओढण्याचा कार्यक्रम होत असतो त्यात मोठ्या संख्येने तरुण जमा होत असतात. यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक विधी रद्द झाले असले तरी काही जमलेल्या तरुणांनी यात्रेतील रथ ओढण्याचा प्रयत्न केला. या रथ ओढण्याला पोलिसांनी रोखले असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक के एस पुजारी, तीन पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड असे पाच जण जखमी झाले. संचारबंदी असताना सर्व धार्मिक कार्यक्रम राज्यात स्थगित केलेले असतानासुद्धा वागदरीत हा निंदनीय प्रकार घडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -