डोंबिवलीकरांनो सावधान! कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, रूगणांची संख्या २८ वर

डोंबिवलीत कोरोनामुळे एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत २८ वर पोहचली आहे.

Change the contractor of Art Gallery Kovid Hospital Demand of social activist Ajay Sawant
आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

देशात आणि राज्यात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवला असतानाच रविवारी डोंबिवलीत कोरोनामुळे एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही कोरानोसदृश्य एका महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत असून, रविवारी करोनाबाधित चार नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत २८ वर पोहचली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डोंबिवलीत आढळले ४ नवीन रुग्ण

कोरोनाबाधित महिला ही डोंबिवली पूर्वेतील रामनगर परिसरातील राहणारी होती. तिच्या घरातील काहीजणांना कोरोनाची बाधा झाली होती. सदर महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित चार नविन रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रूग्‍णसंख्‍या आतापर्यंत २८ झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील तीन कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. त्यात ५४ वर्षीय महिला रूग्ण आहे. त्यांना तापाची लक्षणे जाणवल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तर इतर दोन रुग्णांपैकी ७५ वर्षीय महिला आणि ७ वर्षीय बालिका यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्‍णाच्या निकटवर्तीयांच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चौथी महिला रुग्ण २४ वर्षाची असून, डोंबिवली पश्चिम येथील आहे. ही महिला पॅरिस येथून परत आली होती. सदर चारही करोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.

अधिक माहितीकरीता या क्रमांकावर संपर्क साधा

कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे १५४ आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा. तसेच महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे आणि अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मीणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील ०२५१-२३१०७०० आणि शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील ०२५१-२४८१०७३, ०२५१-२४९५३३८ या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.


हेही वाचा – धक्कादायक! डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाईन व्यक्ती पळाला