घरताज्या घडामोडीLok Sabha : महाराष्ट्रात आई भवानीच्या नाही तर कोणाच्या नावाचा जयघोष करायचा?...

Lok Sabha : महाराष्ट्रात आई भवानीच्या नाही तर कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? दानवेंचा निवडणूक आयोगाला सवाल

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभरात प्रचारासाठी प्रचार गीत लॉन्च केले. 60 सेकंदांचं हे प्रचारगीत आहे. पण या प्रचारगीतावर आता शिवसेना ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. निवडणूक आयोगाने या प्रचारगीचावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नोटीस बजावली आहे. कारण या प्रचारगीतात शेवटी 'जय भवानी, जय शिवाजी' असा उल्लेख आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभरात प्रचारासाठी प्रचार गीत लॉन्च केले. 60 सेकंदांचं हे प्रचारगीत आहे. पण या प्रचारगीतावर आता शिवसेना ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. निवडणूक आयोगाने या प्रचारगीचावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नोटीस बजावली आहे. कारण या प्रचारगीतात शेवटी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उल्लेख आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नोटीसवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘महाराष्ट्रात आई भवानीचे नाही तर मग कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? या असल्या द्वेषाने भरलेल्या खलीत्याला आम्ही भीक घालत नाही’, असं म्हणत अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडले. (Lok Sabha Election 2024 Ambadas Danve Slams Election Commission Over Shiv sena Campaign Song)

शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवरून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. “निवडणूक आयोगाला आमचे प्रचारगीत ऐकून जळजळ उठली आहे. त्या गाण्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी मातेचे जयघोष यांना चालत नाहीये. महाराष्ट्रात आई भवानीचे नाही तर मग कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? या असल्या द्वेषाने भरलेल्या खलीत्याला आम्ही भीक घालत नाही. हा भाजपच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राची अस्मिता दाबण्याचा प्रकार आहे. सहन करणार नाही, महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल.. जय भवानी जय शिवराय”, असे म्हणत अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये एकनाथ शिंदेंना जागा नाही तर…; फडणवीसांचा हल्लाबोल

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रचारगीत लॉन्च केले. धगधगती पेटू दे मशाल.. असं हे टायटल साँग असून कार्यकर्त्यांनी घराघरात हे गीत आणि शिवसेनेचं नवं चिन्ह पोहोचविण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. मात्र ठाकरे गटाच्या मशाल गीतामध्ये ‘जय भवानी’ शब्द असल्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली.

ठाकरे गटाचे 60 सेकंदाच्या प्रचारगीतात काय?

शंखनाद होऊ दे,
रणदुदंभी वाजू दे,
नादघोष गर्जू दे,
विशाल दृष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या
धगधगती पेटू दे मशाल…
जय भवानी… जय शिवाजी

पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

उद्धव ठाकरे यांनी आज (20 एप्रिल) पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. “आम्ही जय भवानी म्हटलं तर धार्मिक प्रचार होतो, मग मोदी, शहा जय बजरंगबली म्हणतात, ते कसे चालते? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेतील भाषण ऐकवले. यामध्ये नरेंद्र मोदी बजरंग बली की जय, असं बोलून बटण दाबा,अशी बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. अमित शहा यांची आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यानंतर आधी मोदी-शहांवर कारवाई करा”, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.

दरम्यान, “नरेंद्र मोदी आणि अमित शहांना हवं ते बोलता येतं मग आम्हाला का नाही ? मोदी, शहांना वेगळे नियम लागू होतात का? असं म्हणत आम्ही जय भवानी म्हणणारच”, अशा शब्दांत निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर दिले.


हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : पहिल्या टप्प्यातच मतदानाचा टक्का घसरला; आयोगाचे नव्याने आवाहन

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -