घरताज्या घडामोडीSC : जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च मोहर उमटताच नवनीत राणांना अश्रू अनावर; म्हणाल्या...

SC : जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च मोहर उमटताच नवनीत राणांना अश्रू अनावर; म्हणाल्या – सत्याचा असत्यावर विजय

Subscribe

Lok Sabha Election 2024 : गेल्या 12 वर्षांपासून जो संघर्ष मी केला आणि विरोधकांनी मला खूप चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत ते गेले, पण अखेर विजय सत्याचाच झाला, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाकडून वैध ठरल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणा यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुंबई : गेल्या 12 वर्षांपासून जो संघर्ष मी केला आणि विरोधकांनी मला खूप चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत ते गेले, पण अखेर विजय सत्याचाच झाला, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिली. जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाकडून वैध ठरल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Lok Sabha Election 2024 Bjp Candidate Navneet Rana Gets Big Relief From Supreme Court Over Caste Certificate)

नवनीत राणा यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याआधी फेब्रुवारीत सुनावणी पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. जात प्रमाणपत्र वैध ठरताच नवनीत राणा यांना आपली पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : मविआचे राज्यात नाही तर देशात सरकार येईल – आदित्य ठाकरे

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

“गेल्या 12 वर्षांपासून मी संघर्ष करत आहे. विरोधकांनी मला खूप चुकीचे बोलण्याचा प्रयत्न केला. अगदी खालच्या पातळीपर्यंत विरोधकांनी टीका केली. माजी सैनिकाच्या मुलीला आणि महत्त्वाचे म्हणजे, एका महिलेला खूप मजबूर केले. हा त्रास मी गेली 12 वर्षांपासून सहन करत आहे. आपण एका महिलेप्रमाणे मेहनत करु शकत नाही. प्रामाणिकपणे समाजासाठी झटू शकत नाही. त्यामुळे मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. एका महिलेच्या चारित्र्यावर बोलले गेले. फसवून कोर्टात खेचण्यात आले. बदनामी करण्याचा घाट गेली 12 वर्षांपासून घातला गेला होता. पण अखेर सत्याचा असत्यावर विजय झाला आहे”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

- Advertisement -

“महिलांच्या जीवनात संघर्ष हा जन्मापासूनच असतो. तो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहतो. पण आज खरं सर्वांसमोर आलं. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते. मी खूप संघर्ष केला. खूप कठिण दिवस पाहिले आहेत. शेवटी खरं समोर आले. मी स्वतः खचले नाही. आम्ही मैदानात ठामपणे उभे राहिलो. सर्व प्रसंगांवर मात करुन मी आज पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे”, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या जागेवर विजयी झाल्यानंतर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले होते. याच जात प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर जून 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना बनावट मोची जात प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, हे प्रमाणपत्रही न्यायालयाने रद्द केले होते. मात्र त्यानंतर नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. Lok Sabha Election 2024

2014 मध्ये पहिली निवडणूक लढवली

नवनीत राणा यांनी 2014 मध्ये अमरावतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणांनी 2019 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्क्याने जिंकली. त्यावेळी नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अमरावतीचे तत्कालीन शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा 36,951 मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, रवी राणा हे महाराष्ट्रातील बडनेरा येथील अपक्ष आमदार आहेत. त्यांनी पक्षही स्थापन केला आहे. नवनीत राणा यांनी नुकताच त्यांचा स्वत:चा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानुसार यंदा नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढवत असून महायुतीच्या उमेदवार आहेत. Lok Sabha Election 2024


हेही वाचा – Lok Sabha 2024: अजित, सुनेत्रा पवार हेच आमचं कुटुंब; सख्ख्या भावाने साथ सोडली पण हे नातेवाईक सोबत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -