घरमहाराष्ट्रपैलवानाशी लढायला भाजपाने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला; संजय राऊतांची विशाल पाटलांवर...

पैलवानाशी लढायला भाजपाने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला; संजय राऊतांची विशाल पाटलांवर टीका

Subscribe

पैलवानाशी लढायला भाजपाने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला, अशी टीका संजय राऊत यांनी विशाल पाटील यांचे नाव न घेता केली.

सांगली : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केल्यानंतर महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाली. सांगली जागेसाठी विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजीत कदम आग्रही होते. मात्र ठाकरे गटाने या जागेचा पुनर्विचार करावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी होती. पण ठाकरे काही ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगानेही त्यांना लिफाफा हे चिन्हा दिले आहे. त्यामुळे आता सांगलीत तिहेरी लढत होणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधताना भाजपावर टीकास्त्र सोडले जात आहेत. (Lok Sabha Election 2024 BJP sent another candidate with an envelope to fight with Pailwana Sanjay Raut Vishal Patil)

भाजपावर निशाणा साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने सांगलीत दोन दोन उमेदवार उभे केले आहेत. आमच्या पैलवानाशी लढत द्यायला त्यांचा एक उमेदवार कमी पडतोय म्हणून त्यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत. खरं तर आमचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे भाजपाला जड जात आहे. त्यामुळे भाजपाने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. या लिफाफ्यामागे कोण आहे? यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची ताकद आहे? त्याच्यावर आम्ही योग्य वेळी बोलू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – MNS : शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर, म्हणाले…

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही आहे. परंतु आमचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जात आहेत. लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे घराघरात लिफाफे वाटण्यासाठी भाजपाने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणला का? अशी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

सांगलीत तिहेरी लढत

दरम्यान, विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र विशाल पाटील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांचे थोरले बंधू प्रतीक पाटील, पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सांगलीतील इतर नेत्यांचं विशाल पाटील यांना पाठबळ मिळताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे आता सांगलीत भाजपा उमेदवार संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर…; विनायक राऊत यांनी सुनावले

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -