घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : राहुल गांधींच्या गाडीला केवळ इंजिनच, डबा नाही;...

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींच्या गाडीला केवळ इंजिनच, डबा नाही; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

Subscribe

एकिकडे विकासाची गाडी आहे, ज्याचे इंजिन पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. दुसरीकडे पण गाडी आहे ती राहुल गांधींची आहे. पण त्या गाडीला केवळ इंजिनच आहे डबा नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात झाली.

नांदेड : एकिकडे विकासाची गाडी आहे, ज्याचे इंजिन पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. दुसरीकडे पण गाडी आहे ती राहुल गांधींची आहे. पण त्या गाडीला केवळ इंजिनच आहे डबा नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात झाली. नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अमित शहांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यावेळी देवेद्र फडणवीसांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, मविआवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 DCM Devendra Fadnavis Slams MVA In Nanded)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“या निवडणुकीत दोनच बाजू आहेत. एकिकडे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती काम करत आहे. या महायुतीत शिवसेना, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष आहेत. आपल्या विकासाच्या गाडीचे इंजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तसेच, या इंजिनसोबत आपण मोठ्या मोठ्या बोगी लावल्या आहेत. या बोगीमध्ये सर्वसामान्य माणसाला बसवून विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम आपण करणार आहोत. आपली गाडी दीन-दलीत, गोर-गरीब, आदिवाशी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, महिला, अल्पसंख्यांक या सगळ्यांना आपल्या गाडीत जागा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपात प्रवेश

“दुसरीकडे पण गाडी आहे. ही गाडी राहुल गांधींची असून केवळ इंजिन आहे, डब्बा नाही. कारण प्रत्येकाला वाटतं आपण इंजिन आहोत. उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव म्हणतात मी पण इंजिन आहे. पण यांच्याकडे डब्बा नाही. मात्र इंजिनमध्ये चालकाशिवाय कोणाला बसायला जागा नसते. पण यांचे इंजिन पाहिलं तर, एक नांदेडला चाललं तर, दुसरं मुंबईला चाललं, एक इंजिन नागपूरला चाललं तर, दुसरं सोलापूरला चाललं म्हणजे हे एकमेकांना अशाप्रकारे ओडत आहेत की, यांची गाडी जागेवरून हालत नाही. न हालणारी, न डुलणारी अशी गाडी आहे. तसेच, यांची गाडी विकासाकडे जाऊ शकत नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच एक्स्प्रेस आपल्याला विकासाकडे नेऊ शकते”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर निशाणा साधला.

- Advertisement -
चिखलीकर आणि चव्हाणांचे भाषण पाहिलं तर, ‘तु मुझे पसंत और मे तुझे पसंत’ – फडणवीस

दरम्यान, “नरसीतील हा जनसागर बघितल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर हे रेकॉर्ड मतांनी विजयी होतील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचे भाषण पाहिलं तर, ‘तु मुझे पसंत और मे तुझे पसंत’ अशाप्रकारचे होते. त्यामुळे आता दोन ताकद एकत्र आल्याने मोठा रेकॉर्ड आपण तयार करणार आहोत, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे पंतप्रधानांना निवडून आणायचं असेल तर, प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मतदान करावं लागेल. कारण प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिलेले मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार आहेत”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पक्षाची शिस्त महत्त्वाची; नाराजीच्या चर्चांवर काय म्हणाल्या वर्षा गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -