घरमहाराष्ट्रLok Sabha : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान; इतर राज्यांची परिस्थिती...

Lok Sabha : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान; इतर राज्यांची परिस्थिती काय?

Subscribe

महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान पार पडले. देशात पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, महाराष्ट्रात 55.29 टक्के मतदान झाले.  

मुंबई : महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान पार पडले. देशात पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर महाराष्ट्रात 55.29 टक्के मतदान झाले. त्रिपुरामध्ये सर्वाधिक टक्के मतदान झाले, तर बिहारमध्ये सर्वाधिक कमी मतदान झाले आहे. (Lok Sabha Election 2024, first phase 55.29 percent polling in Maharashtra)

निवडणूक आयोगाकडून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, त्रिपुरामध्ये 79.92 टक्के, बिहारमध्ये 47.74 टक्के, पश्चिम बंगालमधील तीन जागांसाठी 77.57 टक्के, मणिपूरमधील दोन जागांसाठी 68.62 टक्के, मेघालयातील दोन जागांसाठी 70.84 टक्के, आसाममधील पाच जागांसाठी 71.39 टक्के, पुद्दुचेरीमधील एका जागेसाठी 73.25 टक्के आणि छत्तीसगडमध्ये एका जागेसाठी 63.41 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमध्ये 65.08 टक्के, मध्य प्रदेशातील पाच जागांसाठी 63.50 टक्के, अरुणाचल प्रदेशातील दोन जागांसाठी 65.49 टक्के, सिक्कीममधील एका जागेसाठी 68.06 टक्के आणि नागालँडमधील एका जागेसाठी 56.77 टक्के मतदान झाले. मिझोराममधील एका जागेवर 54.18 टक्के, उत्तर प्रदेशातील आठ जागांवर 57.61 टक्के, उत्तराखंडमधील पाच जागांवर 53.65 टक्के, अंदमान आणि निकोबारमधील एका जागेवर 56.87 टक्के, लक्षद्वीपमधील एका जागेवर 59.02 टक्के मतदान झाले. राजस्थानमधील 12 जागांवर 51.07 टक्के तर तामिळनाडूमध्ये 39 जागांवर 62.19 टक्के मतदान झाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

- Advertisement -

महाराष्ट्रातील पाच जागांवर पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदारांनी मतदाना हक्का बजावला. महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वाधिक 65.97 टक्के मतदान झाले. यानंतर भंडारा-गोंदियात 56.87 टक्के, रामटेकमध्ये 52.38 टक्के, चंद्रपूरमध्ये 55.11 टक्के आणि नागपूरमध्ये सर्वाधिक 49.07 टक्के मतदान झाले. मात्र चंद्रपूर आणि नागपूर मतदारसंघात वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.

नागपूर शहरातील नारा, जरिपटका आणि मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात भाजपाच्या बुथवर त्यांचे कार्यकर्ते मतदारांना गडकरींचे नाव आणि भाजपाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत असल्याचे निदर्शनास आळे. ‘कहो दिल से नितीन जी फिरसे..’ असे मतचिठ्ठ्यावर लिहिण्यात आले होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांच्या या कृतीवर काँग्रेसने आक्षेप घेतला. मध्य नागपुरातील संत कबीर उच्च प्राथमिक आणि हायस्कूल या केंद्राजवळील भाजपाच्या बुथवरील यंत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र नारा परिसरात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाचे चिठ्ठी देणारे यंत्रच फोडले.

हेही वाचा – Lok Sabha : राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण चिन्ह असतं तर…

चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे उमेदवारांच्या यादीवर कॅन्सलचा शिक्का मारल्याची बाब उघडकीस आली. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत मतदान केंद्रावर आक्रमक भूमिका घेतली. यावेळी काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. ज्यामुळे या मतदान केंद्रावर काही वेळासाठी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचाही निषेध करण्यात आला.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -