घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha : राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण...

Lok Sabha : राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण चिन्ह असतं तर…

Subscribe

नारायण राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतं मिळाली असतील.

सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अखेर भाजपाला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. किरण सामंत यांनी आज माघार घेतल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आज नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे किरण सामंतही त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मत मिळाली असती, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली. (Lok Sabha Election 2024 Kiran Samant went to fill the nomination form along with Narayan Rane )

नारायण राणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भुजबळांनी नाशिकमधून माघार घेताच हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

किरण सामंत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये 45 प्लस करण्याकरीता तसेच कुटुंबाशी चर्चा करून मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. परंतु मी नाराज नाही. या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मत मिळाली असती. पण भविष्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. कोकणवासियांवर माझा विश्वास आहे, ते धनुष्यबाण कधीच विसरणार नाहीत, असे किरण सामंत म्हणाले.

- Advertisement -

उमेदवारीतून माघार घेण्याबाबत बोलताना किरण सामंत म्हणाले की, माझा हेतू स्वच्छ होता. परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहणार आहे आणि ते सहाजिकच आहे. भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्याने सांगितले म्हणून मी उमेदवारी मागे घेणारं ट्वीट डिलीट केलं होतं, असा गौप्यस्फोटही किरण सामंत यांनी यावेळी केला.

उमेदवारी मिळाल्यावर नारायण राणे काय म्हणाले?

दरम्यान, उमेदवारी मिळाल्यावर नारायण राणे म्हणाले की, विकासाचा आणि मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यंदाच्या निवडणुकांमध्ये 400 पार करायचं आहे. यासाठी आपला देश विकसित बनावा, आत्मनिर्भर बनावा हे प्रचाराचे मुद्दे असतील. अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; पहिल्याच सभेत अजित पवारांना म्हटले दुर्योधन 

Edited By – Rohit Patil

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -