घरमहाराष्ट्रनागपूरLok Sabha 2024 : मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Lok Sabha 2024 : मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Subscribe

नागपूरमधील काही मतदार केंद्राजवळील भाजपाच्या बुथवर महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि कमळाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या मतदारांना दिल्या जात होत्या. भाजपाच्या या कृतीवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला.

नागपूर : लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदान विदर्भात पार पडत आहे. मात्र मतचिठ्ठ्या देण्यावरून भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे नागपूर मतदारसंघात पाहायला मिळाले. नागपूरमधील काही मतदार केंद्राजवळील भाजपाच्या बुथवर महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि कमळाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या मतदारांना दिल्या जात होत्या. भाजपाच्या या कृतीवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या बुथवरील यंत्र फोडण्यात आले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपाला त्यांचे यंत्र परत केले आहे. (Lok Sabha Election 2024 Nagpur Constituency Nitin Gadkari’s Photo on Ballot Paper BJP and Congress Workers Argument )

महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पण नागपूर शहरातील नारा, जरिपटका आणि मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात भाजपाच्या बुथवर त्यांचे कार्यकर्ते मतदारांना गडकरींचे नाव आणि भाजपाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत असल्याचे निदर्शनास आळे. ‘कहो दिल से नितीन जी फिरसे..’ असे मतचिठ्ठ्यावर लिहिण्यात आले होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांच्या या कृतीवर काँग्रेसने आक्षेप घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भुजबळांनी नाशिकमधून माघार घेताच हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

भाजपाची ही कृती निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आणि भाजपाच्या बुथवरील मतचिठ्ठी काढणारे यंत्र हटवण्यास सांगितले. त्यामुळे तिन्ही ठिकाणी भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य नागपुरातील संत कबीर उच्च प्राथमिक आणि हायस्कूल या केंद्राजवळील भाजपाच्या बुथवरील यंत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र नारा परिसरात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाचे चिठ्ठी देणारे यंत्रच फोडले. यानंतर भाजपाच्या सुमारे 300 कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली. आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपाला यंत्र परत केले आहे. मात्र घडलेल्या प्रकारानंतर भाजपाने बुथवरील यंत्र हटवले आहे.

- Advertisement -

चंद्रपूरमध्येही तणावाचे वातावरण (Atmosphere of Tension in Chandrapur)

दरम्यान, चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का मारल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत मतदान केंद्रावर आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचाही निषेध करण्यात आला.

हेही वाचा – Lok Sabha : निवडणुकीला ग्लॅमरची जोड; महिला अधिकाऱ्यांचा गॉगलमधील फोटो व्हायरल

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -