घरमहाराष्ट्रLok Sabha : शिवानी वडेट्टीवार चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या प्रचारापासून दूर; कारण...

Lok Sabha : शिवानी वडेट्टीवार चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या प्रचारापासून दूर; कारण काय?

Subscribe

काँग्रेसकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी देण्यात आली. यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करणं अपेक्षित होतं. मात्र आज प्रचाराच्या सात दिवसाचा कालावधीत शिवानी वडेट्टीवार चंद्रपुरात दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आता टीका होताना दिसत आहे. 

मुंबई : चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक तथा प्रदेश युवक काँग्रेसची सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी वरिष्ठांची भेट घेत प्रयत्न केले. मात्र काँग्रेसकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी देण्यात आली. यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करणं अपेक्षित होतं. मात्र आज प्रचाराच्या सात दिवसाचा कालावधीत शिवानी वडेट्टीवार चंद्रपुरात दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आता टीका होताना दिसत आहे. (lok sabha election 2024 Shivani wadettiwar away from Chandrapur candidate Pratibha Dhanorkars campaign)

प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात वडीलांचा हात पकडून सक्रीय असलेल्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. एवढंच नाही तर त्यांनी मी लोकसभेची उमेदवारी मागणार आहे, तेव्हा सहकार्य करा म्हणून अनेकांच्या घरी भेटही दिली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांनी काही आंदोलनेही केली. ओबीसी मोर्चा आणि बेरोजगारांच्या मोर्चाला त्यांनी हजेरी लावली. मुंबई आणि दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठींकडे लोकसभेची उमेदवारीही मागितली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी

विजय वडेट्टीवार यांनीही आपले पक्षातील वजन वापरले. खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह अनेक नेत्यांच्या घरी जाऊन आपल्या लेकीसाठी उमेदवारी मागितली. मात्र पक्षाने एक तर तुम्ही लढा किंवा आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवा अशी भूमिका घेतली. पक्षाने लेकीला उमेदवारी देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर वडेट्टीवार यांनी आग्रह करणं सोडून दिलं. तसेच विजय वडेट्टीवार यांनी स्वत: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली.

- Advertisement -

प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवानी वडेट्टीवर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र त्या प्रचारापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी मिळाली नाही तर किमान पक्षाचा प्रचार करण्याची तरी तयारी दाखवायला हवी होती. जेणेकरून पक्षाने भविष्यात तरी उमेदवारी देण्याचा विचार केला असता. स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवायचे ही कुठली निष्ठा? शिवानी वडेट्टीवार स्वत:साठी काम करतात की पक्षासाठी? असे प्रश्न काँग्रेस वर्तुळात विचारले जात आहेत.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : फडणवीसांकडून उमेदवारी, मात्र श्रीकांत शिंदेंची भाजपा कार्यकर्त्यांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -