घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : आमचे मत..., चंद्रपुरात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 : आमचे मत…, चंद्रपुरात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

लोकसभेच्या उत्सवामध्ये तृतीयपंथीयांनीही उत्साहाने सहभाग घेतला आहे. चंद्रपूर लोकसभेतील वर्धा वेली मतदान केंद्रावर आज (ता. 19 एप्रिल) सकाळीच तृतीपंथीयांनी मतदान करण्यासाठी हजेरी लावली.

चंद्रपूर : लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. नागरिकांनी दुपारच्या उन्हाआधी घराच्याबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे सर्व पक्षाच्या नेतेमंडळींकडून सांगण्यात येत आहे. लोकसभेच्या या उत्सवामध्ये तृतीयपंथीयांनीही उत्साहाने सहभाग घेतला आहे. चंद्रपूर लोकसभेतील वर्धा वेली मतदान केंद्रावर आज (ता. 19 एप्रिल) सकाळीच तृतीपंथीयांनी मतदान करण्यासाठी हजेरी लावली. (Lok Sabha Election 2024 Third genders voted in Chandrapur)

गेल्या काही वर्षांपासून तृतीयपंथीयांनाही मतदान करण्याचा हक्क मिळाला असून ते मोठ्या उत्साहाने आपला हा हक्क बजावत आहे. चंद्रपुरातील वर्धा वेली मतदान केंद्रावर सकाळीच 15 ते 20 तृतीयपंथीचायांच्या समुहाने हजेरी लावली. त्यासोबतच यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. आमचे मत आमच्या हक्काच्या नेत्यासाठी असून त्या नेत्याने महागाई व नागरिकांचे इतर प्रश्न सोडवावे, यासाठी आम्ही मतदान करत असल्याचे या तृतीयपंथीयांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : माझा विजय 101 टक्के निश्चित, गडकरींनी व्यक्त केला विश्वास

लोकशाहीच्या उत्सवाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत. विदर्भात ज्या प्रमाणे तापमानाचा पार वर चढला आहे, त्याचप्रमाणे मतदारांचा उत्साह देखील वाढताना पाहायला मिळत आहे. यावेळी काही तृतीयपंथीयांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांनी वेळात वेळ काढून मत देऊन आपल्या नेत्याची निवड केली पाहिजे. आम्ही तृतीयपंथी असलो तरी दरवेळी हा आमचा हक्क बजावणार आहोत आणि आमच्या लाडक्या नेत्याला आमचे मत देणार आहोत.

- Advertisement -

तसेच, आमचे मत हे आमच्या विश्वासू नेत्याला असेल. तो नेता 100 टक्के विजयी होणारच, असा विश्वासही या तृतीयपंथीयांकडून व्यक्त करण्यात आला. इतकेच नाही तर आम्ही ज्या उमेदवाराला मत देणार आहोत, तो नेता विजयी होईल आणि आमच्या नेत्याचे सरकार येताच, गरिबांना न्याय मिळेल, महागाईपासून सुटका होईल, या देशात एका चांगल्या व्यक्तीचे सरकार बनावे, यासाठी आमचे मत असणार आहे, असेही यावेळी या तृतीयपंथीयांकडून सांगण्यात आले.

यंदाच्या वेळी मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांही आपल्या मतदानाचा हक्क राज्यभरात बजावणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात तृतीयपंथीयांची नाव नोंदणी सुरू होती. यावेळी काही विशेष नियम घालून तृतीयपंथीयांनाही मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती तृतीयपंथी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मोदींच्या विकसित भारताला पाठिंबा देण्यासाठी मतदान करा, बावकुळेंचे आवाहन


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -