घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : सर्वत्र भाजप, महायुतीचे उमेदवार विजयी होतील -...

Lok Sabha Election 2024 : सर्वत्र भाजप, महायुतीचे उमेदवार विजयी होतील – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

महाराष्ट्रात आज (19 एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होणार आहे.

चंद्रपूर : महाराष्ट्रात आज (19 एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सर्वत्र भाजप आणि महायुतीचेच उमेदवारच विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024 BJP and mahayuti candidates will win everywhere says Sudhir Mungantiwar)

“आमचे कार्यकर्ते पक्षाच्या विचारासाठी, देश हितासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी काम करत आहेत. ही माझी 9 वी निवडणूक आहे. याआधी मी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. सहावेळा विधानसभा निवडणूक लढवल्या आणि जिंकल्या. मी देवाचं दर्शन घेत आता मतदानासाठी जात आहे. मी देवाकडे कधीच काही मागितलं नाही. पण जेव्हा संधी प्राप्त होते तेव्हा संधीचे सोनं करायचं हे महत्त्वाचे असते”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींच्या विकसित भारताला पाठिंबा देण्यासाठी मतदान करा, बावकुळेंचे आवाहन

“हा एक राष्ट्रीय उत्सव असून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. बोटावर शाईचा थेंब लागण्यासाठी हजारो शहिदांनी आपल्या शरीरातील रक्ताचा थेंब भारतामातेला अर्पण केला आहे. सियाचीनमधील प्रचंड थंडीत आपला सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी उभा असतो. पण आपण ऊन आहे म्हणून मतदान केंद्रावर जात नाही. त्यावेळी मनाला विचारलं पाहिजे की हजारो शहिदांनी इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलल्या त्यामुळे आपल्याला मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले पाहिजे”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

“शाईचा थेंब हा अनमोल आहे हे विसरता कामा नये. याच शाईच्या थेंबासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. राष्ट्र हितासाठी मतदान होईल. देश विकासासाठी मतदान होईल. या सगळ्यात भाजप आणि महायुतीचे उमेदवार निवडून येतील”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“ज्या दिवशी मे लोकसभेचा अर्ज भरला त्याच दिवशी प्रतिभा धानोरकर यांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक ही उत्तम वातावरणात झाली पाहिजे. कारण विजय आणि पराभव हा कधीच महत्त्वाच नसतो. लोकांना जिंकायचे असते. मी 1989 ची निवडणूक पराभूत झालो होतो. पण 1995 च्या नंतरच्या निवडणूक मला जनतेने सातत्याने निवडून दिले. कारण राजकारणात प्रोफेशन म्हणून नाही तर मिशन म्हणून काम करायचे असते”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : माझा विजय 101 टक्के निश्चित, गडकरींनी व्यक्त केला विश्वास

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -