घरताज्या घडामोडीनवनीत राणांना तुरुंगात जातीवाचक शिवीगाळ, लोकसभा अध्यक्षांनी मागवला राज्य सरकारकडून अहवाल

नवनीत राणांना तुरुंगात जातीवाचक शिवीगाळ, लोकसभा अध्यक्षांनी मागवला राज्य सरकारकडून अहवाल

Subscribe

खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खार पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणूकीबाबत महाराष्ट्र सरकारविरोधात तक्रार केली होती. पाणी मागितल्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच जातीमुळे आपल्याला पाणी देण्यात आले नाही असे नवनीत राणांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. या पत्राची दखल लोकसभा अध्यक्षांनी घेतला असून महाविकास आघाडी सरकारला २४ तासांची वेळ दिली आहे. २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

खासदार नवनीत राणा यांना सामाजिक तेढ निर्माण करणाके विधान केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असे आव्हान नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिले होते. राणा यांना खार पोलिसांनी अटक केली असून त्यांना २३ एप्रिल २०२२ रोजी पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. घटनेची माहिती गृहमंत्रालयाच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्षांनी मागितली आहे.

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांनी पत्रात म्हटलं आहे की, अनुसूचित जातीची असल्यामुळे जेलमध्ये पाणी देण्यात आले नाही. तसेच प्रसाधनगृहात जाण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली. नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर रवी राणांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

पोलीस महासंचालक रिपोर्ट सादर करणार

खासदार नवनीत राणा यांच्या पत्रानंतर लोकसभा अध्यक्षांनी २४ तासात अहवाल मागितला आहे. या प्रकरणावर आथा पोलीस महासंचालक रिपोर्ट सादर करणार आहेत. खार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि तेथील कैद्यांचा या प्रकरणात जबाब घेतला जाऊ शकतो. पोलीस सीसीटीव्ही फुटेजसुद्धा सादर करु शकतात. खासदार नवनीत राणांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघात; उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 ठार तर 2 जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -