घरमहाराष्ट्रMaha TET 2021: आजपासून टीईटी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, असा करा अर्ज

Maha TET 2021: आजपासून टीईटी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, असा करा अर्ज

Subscribe

राज्यात शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. (Maharashtra Teacher Eligibility Test ) येत्या १० ऑक्टोबरला TET ची परीक्षा होणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

TET परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी mahatet.in वरून नोंदणी करू शकतात. नोंदणीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२१ आहे. तर १० ऑक्टोंबर २०२१ ला MAHA TET 2021 साठी परीक्षा होईल. या वर्षी MAHA TET परीक्षा दोन वर्षानंतर घेण्यात येत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र टीईटी परीक्षा २०२१ मध्ये पेपर I आणि पेपर- II पेपर असे दोन पेपर असतात. साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क ५०० रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क ८०० रुपये आहे. तर अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क २५० रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क ४०० रुपये असेल.

अर्ज कुठे कराल?

TET परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरु होईल.

- Advertisement -

TET परीक्षेचं वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१, वेळ ११.५९ वाजेपर्यंत

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे – २५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ स. १०.३० ते दु ०१.००

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ दु. ०२.०० ते सायं. ०४.३०

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -