घरदेश-विदेशऑलिम्पिक संघाला पंतप्रधान मोदींचे आमंत्रण; १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर केले आमंत्रित

ऑलिम्पिक संघाला पंतप्रधान मोदींचे आमंत्रण; १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर केले आमंत्रित

Subscribe

यंदाच्या वर्षी १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यादिना निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग आठव्यांदा लाल किल्यावरून देशाला संबोधित करणार आहे. यासह यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय ऑलिम्पिक संघाला १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी ऑलिम्पिक संघाला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित करतील आणि त्यांच्याशी देखील संवाद साधतील. टोकियो ऑलिम्पिकमध्ये १२० पेक्षा जास्त खेळाडूंसह २२८ लोकांची संघ भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू असताना मोदी नियमितपणे संघाला प्रोत्साहन करत आहेत आणि यादरम्यान त्यांनी अनेकांची संवाद देखील साधला.

आज ३ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी भारताचे सर्वाधिक खेळाडू यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले होते. पंतप्रधान मोदी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या सामन्यावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी पुरुष हॉकी संघाचा उपांत्य सामना पाहिला आणि त्यांनी ट्विट करून याबाबत माहितीही दिली होती. मात्र, हा सामना भारताने बेल्जियमविरुद्ध 2-5 असा गमावला आणि पदरी निराशा आली. मात्र या पराभवानंतर पंतप्रधानांनी हॉकी संघाचे कर्णधार मनप्रीत सिंग यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा केली आणि पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -

भारताने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे, यासह पुरुष आणि महिला हॉकी संघ पदकाच्या शर्यतीत आहेत. याशिवाय महिला बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेननेही उपांत्य फेरी गाठून पदकाची मानकरी ठरली आहे. मीराबाई चानूने २४ जुलै रोजी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले. त्यानंतर १ ऑगस्टला पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आणि भारताची मान उंचावली.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -