उद्या मंत्रिमंडळ विस्तार; वाचा कुणाला किती मंत्रीपदे मिळणार

maha vikas aghadi sarkar cabinet expansion
२४ डिसेंबरला महा विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार

महा विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजेच २४ डिसेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी सहा मंत्र्यांसहीत शपथविधी घेत राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी ठाकरे सरकारचे खाते वाटप करण्यात आले होते. नागपूर मधील हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले आहे. आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या होत्या. त्याप्रमाणे उद्या मंत्रिमंडळ होणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्या दुपारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत. यापैकी १० कॅबिनेट तर ३ राज्यमंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री शपथ घेणार असून त्यांचेही १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री आहेत. तर काँग्रेसतर्फे १० मंत्री शपथ घेणार आहेत. यापैकी ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री आहेत.