पोलादपूरवरून महाबळेश्वरला जाताय?, मग ही बातमी नक्कीच वाचा!

पावसाळ्यात आंबेनळी घाटात दरड कोसळ्याचे प्रकार वारंवार घडत असतात. रस्ताही बंद केला जातो. प्रवाशांना याचा नाहक त्रास होतो. दुरुस्ती करण्यासाठी हा मार्ग उद्या बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाण्याला मार्ग करुन देण्यासाठी व पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे मोऱ्या टाकल्या जाणार आहेत. जेथे दरड कोसळ्याचा धोका आहे तेथे दुरुस्ती केली जाणार आहे.

रायगडः महाबेळश्वर- पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट उद्या, ४ जानेवारीला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे. दुरुस्तीसाठी हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी या मार्गावरुन जाऊ नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. आंबेनळी घाट ऐवजी वरणघाटमार्गे सातारा व पुण्याकडे जाता येणार आहे.

पावसाळ्यात आंबेनळी घाटात दरड कोसळ्याचे प्रकार वारंवार घडत असतात. रस्ताही बंद केला जातो. प्रवाशांना याचा नाहक त्रास होतो. दुरुस्ती करण्यासाठी हा मार्ग उद्या बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाण्याला मार्ग करुन देण्यासाठी व पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे मोऱ्या टाकल्या जाणार आहेत. जेथे दरड कोसळ्याचा धोका आहे तेथे दुरुस्ती केली जाणार आहे. घाटातील पार फाटा ते मेटतळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे, असे महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.

कोकणातून सातारा व महाबळेश्वकडे जाण्यासाठी पोलादपूर येथून मार्ग आहे. पोलादपूर एसटी आगाराच्या बाजूने आंबेनळी घाटाकडे जाण्याचा मार्ग आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळून हा मार्ग आंबेनळी घाटात जातो. प्रतापगड किल्ल्याकडे ह्याच मार्गावरुन जाता येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तसेच प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी या मार्गाचा सर्रास वापर केला जातो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या मार्गाचा वापर केला जात आहे. परिणामी येथे वाहनांची वर्दळ असते.

हा घाट काही ठिकाणी निमुळता आहे. धोकादायक वळणे आहेत. घाटात अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. मोठा अपघात झाला तर हा घाट तासंतास बंद असतो. पावसाळ्यात तर या मार्गावरुन जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरडी कोसळणे, रस्ता खचलणे, अशा घटना पावसाळ्यात घडत असतात. अशा घटनांमुळे एका बाजूचा रस्ता बंद केला जातो. याने वाहतूककोंडी होते व वाहनांच्या लांबच लांब रांगा येथे लागतात. या घटना टाळण्यासाठी येथे वारंवार रस्त्याची दुरुस्ती केली जाते. गेल्यावर्षीही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी येथील रस्ता बंद ठेवण्यात आला होता.