घरदेश-विदेशLive Update : बीडमध्ये शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल

Live Update : बीडमध्ये शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

बीडमध्ये शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल


पुण्यातील धायरी येथे कारखान्याला आग. अग्निशमन दलात्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

- Advertisement -

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मागणी मान्य

महाराष्ट्रात होणार पहिली महिला केसरी स्पर्धा

- Advertisement -

२३ आणि २४ मार्च रोजी सांगलीत होणार स्पर्धा

शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेला राहणार उपस्थित


उद्धव ठाकरे कुटुंबाला कोर्टाचा दिलासा, संपत्तीसंदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या गौरी भिडेंना ठोठावला २५ हजारांचा दंड


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

उद्या ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल करणार युक्तिवाद


राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल

हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर मुश्रीफ ईडी कार्यालयात पोहोचले


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरून शिवसेनेचे मनिंदर सिंग यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु

महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद संपला


प्राथमिक शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ संपातून बाहेर पडण्याची शक्यता

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली माहिती


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरून शिवसेनेचे महेश जेठमलानी यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु


ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील पुढील सुनावणी २१ मार्चला

जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग ३) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सुरू होती सुनावणी


अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी देण्यात आला दिलासा


आग्रा-लखनऊ एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात

भरधाव गाडीने दुसऱ्या वाहनाला दिली जोरदार धडक

अपघातात पाच लोकांचा जागीच मृत्यू


बिहार विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

भाजप आमदाराने सभागृहातील माईक तोडला

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची करण्यात आली मागणी


अदानीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभा २ वाजेपर्यंत तहकूब


हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात जाणार

दुपारी ३ वाजता जाणार ईडी कार्यालयात


शिवसेना (शिंदे गट) महेश जेठमलानींचा युक्तीवाद सुरू


हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा

पुढील दोन आठवडे मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश

मुश्रीफांनी जामीन अर्ज करण्याचे कोर्टाचे निर्देश


राजकीय पक्षाऐवजी विधिमंडळ पक्ष मोठा असतो : कौल

शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना : नीरज कौल

वकील साळवे यांच्याकडून दहाव्या परिेच्छेदाचे वाचन

साळवेंनी बोम्मई प्रकरण, रेबिया प्रकरणाचा सुप्रिम कोर्टात दिला दाखला

सुप्रिम कोर्टात शिवसेनेचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद सुरू

राज्यपाल आणि अध्यक्षांच्या अधिकारावर चर्चा सुरू


1984 भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना वाढीव भरपाई मिळणार नाही

केंद्र सरकारची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली


आमदार नितीन देशमुख यांनी पुकारले आमरण उपोषण


अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

मुंबई-पुणे मार्गावर झाडांचे पुनर्रोपण करताना हल्ला


विधान परिषदेत गटनेत्यांची बैठक

हक्कभंग समितीच्या अध्यक्षांबाबत चर्चा होणार

भाजपाकडून प्रसाद लाड यांना अध्यक्ष करण्याची मागणी

काँग्रेसकडून भाई जगतापांना अध्यक्ष करण्याची मागणी


अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडून बालकाचा मृत्यू

अहमदनगरच्या पाथर्डी येथील घटना


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही सुनावणी


नाशिकमधून निघालेले लाल वादळ आज मुंबईत धडकणार


जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारचे १८ लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -