घरताज्या घडामोडीजळगाव वसतिगृह प्रकरण: ''त्या' बातमीत कोणतंही तथ्य नाही, पत्रकारावर होणार कारवाई'

जळगाव वसतिगृह प्रकरण: ”त्या’ बातमीत कोणतंही तथ्य नाही, पत्रकारावर होणार कारवाई’

Subscribe

जळगावमधील शासकीय महिला आशादीप वसतिगृहात महिलांना कपडे काढून पोलिसांनी नाचायला लावल्याचे धक्कादायक कृत्य समोर आलं होते. हाच मुद्दा काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (maharashtra assembly budget session 2021)  भाजपच्या नेत्यांनी लावू धरला आणि दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. पण आता या घटनेबाबत एक महत्त्वाचा खुलासा अधिवेशनाच्या चौथ्या दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. जळगावच्या शासकीय महिला आशादीप वसतिगृहाच्या बातमीत काही तथ्य नसून ती खोटी असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी आज केला. तसेच या बातमी देणाऱ्या पत्रकारावर कारवाई होणार असल्याचे देशमुखांनी सांगितले.

जळगाव येथील वसतिगृहातील घटनेप्रकरणी सहा महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच समिती गठन केली होती. या घटनेची सविस्तर चौकशी करून सहा महिला अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल गृहमंत्र्यांकडे दिला. या चौकशीत ४१ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. जळगावच्या या बातमीत काही तथ्य नसल्याचे या अहवालात स्पष्ट झाले.

- Advertisement -

काय आहे तथ्य?

जळगाव येथील शासकीय महिला आशादीप वसतिगृहात एकूण १७ महिला राहत आहेत. २० फेब्रुवारी रोजी या वसतिगृहात मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये गरबा, कविता वाचन अशाप्रकारचे कार्यक्रम होते. त्यावेळेस महिलेने लांब झगा घातला होता आणि त्यावेळेस तिला त्रास होऊन लागला. त्यामुळे तिने तो झगा काढला. दरम्यान या वसतिगृहामध्ये एक सुद्धा पोलीस अधिकारी जाऊ शकत नाही. कारण ते महिला वसतिगृह आहे. त्यामुळे या बातमीमध्ये काहीच तथ्य नाही, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

तक्रार महिला पतीने ती वेडसर असल्याचे कबुल केलं आहे. या तक्रार महिलेने नाव रत्नमाल सोनार असून तिच्या पतीने माझी पत्नी वेडसर आहे, तिला मनोरुग्णालयात दाखल करा, अशा अनेक तक्रार केल्या होत्या, असं सांगून अनिल देशमुख यांना हा अहवाल पटलावर ठेवला. तसेच या प्रकरणाची पूर्ण माहिती न घेता, अशापद्धतीने ज्या पत्रकाराने चुकीची बातमी दिली आहे. त्याच्याबद्दल चौकशी करून योग्य ती नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असं देशमुख म्हणाले.

- Advertisement -

अशा घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी – अजित पवार

अशा पद्धतीच्या घटनांनी महाराष्ट्राची बदनामी होते. महिलांनी तक्रार केल्यावर आम्ही त्याची दखल घेतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पण अशा बातम्या आल्यावर त्याची शहानिशा न करता प्रसिध्दी देऊ नये. जळगाव, औरंगाबाद घटनेमध्ये काही तथ्य नव्हत. पण सर्व माहिती घेणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – धक्कादायक! कोरोना ‘पॉझिटिव्ह’ महिलेकडे डॉक्टराने केली शरीरसुखाची मागणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -