दहशतवाद्यांचे महाराष्ट्र कनेक्शन उघड; नांदेड, मनमाड, नवी मुंबईवर विशेष लक्ष

खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या मदतीने काही लोकांचे धु्रवीकरण करणार असल्याचा संशय असून याबाबत काही पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहे. गेल्या आठवड्यात हरियाणाच्या कर्नाल येथील बस्तारा परिसरातून सीमा सुरक्षा दलाने चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Arrested
प्रातिनिधिक फोटो

हरियाणा येथून अटक करण्यात आलेल्या चार खलिस्तानी दहशतवाद्यांचा ताबा लवकरच महाराष्ट्र एटीएस घेणार आहे. या चौघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले असून त्यातून त्यांचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर राज्य एटीएसने नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईत विशेष लक्ष ठेवले आहे.

खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या मदतीने काही लोकांचे धु्रवीकरण करणार असल्याचा संशय असून याबाबत काही पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहे. गेल्या आठवड्यात हरियाणाच्या कर्नाल येथील बस्तारा परिसरातून सीमा सुरक्षा दलाने चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. गुरुप्रीत, अमनदीप, परमिंदर, भूपिंदर नाव असलेले ते चौघेही खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असून त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी साडेसात किलो आरडीएक्स, तीस जिवंत काडतुसे, एक पिस्तूल आणि सव्वालाख रुपयांची कॅश जप्त केली होती. चारही दहशतवादी मूळचे पंजाबचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे काही विदेशी सिमकार्ड सापडले असून त्यांना आगामी काळात मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणायचा होता. त्यात आदिलाबादसह महाराष्ट्रातील काही ठिकाणांचा समावेश होता.

आतापर्यंतच्या चौकशीतून त्यांच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात संबंधित अधिकार्‍यांना यश आले आहे. या दहशतवाद्यांचा म्होरक्या हरविंदर ऊर्फ सिंह रेडा असून त्याच्या आदेशावरुन घातपात कारवायाची तयारी सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. अटक दहशतवाद्यांचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आल्यानंतर या अधिकार्‍यांनी महाराष्ट्र राज्य एटीएसला सतर्कचा इशारा दिला होता. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईत विशेष लक्ष केंद्रीत केले आहेत. याच प्रकरणात रिंडाच्या नांदेड येथील घरावर एटीएसने छापा टाकून कारवाई केली होती. या दहशतवाद्यांकडून अनेक गोष्टींचा खुलासा झाल्याने त्यांचा लवकरच त्यांचा महाराष्ट्र एटीएस घेणार आहेत.

या दहशतवाद्यांच्या संपर्कात नवी मुंबईतील एक तरुण संपर्कात होात. तो खिश्चन समाजातील असला तरी सध्या तो शीख धर्माचा प्रचार करीत होता. काही महिन्यांपूर्वीच तो दिल्लीला गेला होता. यावेळी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु होते. यावेळी त्याच्यासोबत इतर काही लोक होते. खालिस्तानी दहशतवादी स्लिपर सेल बनविणच्या तयारीत असून त्याद्वारे काही लोकांचे धुवीकरण करणार असल्याची माहितीही एटीएसला प्राप्त झाली आहे. या चौघांचा ताबा मिळाल्यानंतर त्यांच्याकडून आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.