Coronavirus Maharashtra: मंत्रालयात आता मास्कशिवाय एंट्री नाही

Mantralaya
मंत्रालय

राज्याचा प्रशासकीय गाडा ज्या इमारतीमधून चालतो त्या मुंबईस्थित मंत्रालयात आता कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आणखी काळजी घेण्यात येत आहे. यापुढे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य जनतेला मास्क घालूनच आत जावे लागणार आहे. सरकारने मंत्रालयात मास्क बंधनकारक केला असून पुढील निर्णय येईपर्यंत कुणालाही मास्कशिवाय परवानगी दिली जाणार नाही.