घरताज्या घडामोडीकुपवाडामध्ये चकमक : ५ जवान शहीद तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडामध्ये चकमक : ५ जवान शहीद तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू - काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ५ जवान शहीद झाले असून ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असताना छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार चकमक झाली. यात १४ जवान जखमी झाले तर १३ जवान बेपत्ता असल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आज पुन्हा जम्मू – काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहे. तर पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

कुपवाडातील लाइन ऑफ कंट्रोलजवळ झालेल्या या चकमकीत हिमाचल प्रदेशचे सुभेदार संजवी कुमार, उत्तराखंडचे हवालदार देवेंद्र सिंह, हिमाचल प्रदेशचे पॅरा ट्रूपर बाळकृष्ण, उत्तराखंडचे पॅरा ट्रूपर अमित कुमार आणि राजस्थानचे छत्रपाल सिंह शहीद झाले आहेत.

- Advertisement -

उत्तर काश्मिरच्या केरन सेक्टरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, जवानांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले, अशी माहिती लष्कराचे अधिकारी कर्नल राजेश कालिया यांनी दिली आहे.

या चकमकी दरम्यान लष्कराचा एक जवान घटनास्थळी शहीद झाला. तर चार जवान जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला. तर आणखी दोन जवानांचा रात्री उशिरा उपचारा दरम्यान, मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -