घरमहाराष्ट्रमी कोऱ्या पाकिटाप्रमाणे, वरिष्ठ नेते देतात ती जबाबदारी स्वीकारतो - चंद्रकांत पाटील

मी कोऱ्या पाकिटाप्रमाणे, वरिष्ठ नेते देतात ती जबाबदारी स्वीकारतो – चंद्रकांत पाटील

Subscribe

महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद देखील काढून घेतलं जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी कोऱ्या पाकिटाप्रमाणे, वरिष्ठ नेते देतात ती जबाबदारी स्वीकारतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांतदादांच्या या प्रतिक्रियेने त्यांनी बदलांचे संकेत दिलेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भाजपमध्ये चार-पाच वरिष्ठ नेते विचार करुन जबाबदारी देत असतात, त्यामुळे आपण डोके चालविण्याची गरज नसते. मी कोऱ्या पाकिटाप्रमाणे असून पक्षाने दिलेली जबाबदारी आनंदाने पार पाडतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाराज असल्याने भेटले नाहीत, या चर्चा निर्थक असल्याचं स्पष्ट केलं.

- Advertisement -

पक्षश्रेष्ठी नाराज नाहीत

चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना भेटल्यानं पक्षश्रेष्टी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अशा चर्चांमध्ये अर्थ नाही. अध्यक्ष नड्डा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा झाली. केंद्रीय मंत्री भेटले. पक्षश्रेष्ठी नाराज असते, तर नड्डा आणि अन्य नेते भेटले असते का?, असा सवाल त्यांनी केला.

नवीन केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी हा दौरा होता

नवीन केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन करणे, त्यांच्या खात्यांचा राज्यातील जनतेला कसा उपयोग करून घेता येईल, राज्यातील नेत्यांचा केंद्रीय मंत्री आणि नेत्यांशी परिचय होणे आणि राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी हा दौरा होता, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीत चार दिवस तळ ठोकून पण अमित शहांची भेट नाही; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -